Stock Market Closing : सेन्सेक्स 59,959 वर बंद, 'या' क्षेत्रामध्ये झाली घसरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 BSE

Stock Market Closing : सेन्सेक्स 59,959 वर बंद, 'या' क्षेत्रामध्ये झाली घसरण

Stock Market Closing : देशांतर्गत शेअर बाजारात आज चांगली तेजी नोंदवली आहे. कालच्या तुलनेत सेन्सेक्स 200 अंकांनी वाढून आज बाजार बंद झाला. निफ्टी 17,800 च्या जवळ बंद झाला.

हेही वाचा: RBI Meeting : महागाई रोखण्यात अपयशी ठरल्यानंतर RBI ने घेतला 'हा' निर्णय

भारतीय शेअर बाजारातील उलाढाल आज जोरदार होती. गुंतवणूकदारांच्या खरेदीच्या जोरावर बाजारात चांगल्या तेजीसह व्यवहार बंद झाला. सेन्सेक्स 200 अंकांच्या वाढीसह बाजार बंद झाला आहे. निफ्टी 17,800 च्या जवळ बंद झाला आहे. आज, बँक निफ्टीच्या घसरणीने बाजाराची गती मर्यादित केली आहे, अन्यथा तो अधिक गतीने बंद होऊ शकला असता.

हेही वाचा: Post Office Scheme : फक्त 299 रुपयांच्या गुंतवणुकीत मिळणार 10 लाखांचा फायदा

बीएसईचा (BSE ) 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 0.34 टक्क्यांच्या वाढीसह 59,959  वर बंद झाला. NSE चा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 0.28 टक्क्यांच्या मजबूतीसह 17,786 च्या पातळीवर बंद झाला आहे.