शेअर बाजारात पडझड सुरूच, आज कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल?

Share Market updates
Share Market updatesFile Photo

बुधवारी शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता दिसून आली. शेअर बाजार सलग चौथ्या दिवशी लाल चिन्हात अर्थात घसरणीसह बंद झाला. रियल्टी, मेटल आणि आयटी शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली. याशिवाय बँकिंग(Banking), फार्मा(Farma), एफएमसीजी (FMCG) शेअर्सवर दबाव दिसून आला. मात्र, ऑटो शेअर्समध्ये किरकोळ खरेदी झाली. (stock Market conditions on Thursday 16-12-2021 which share is beneficial)

मोठ्या शेअर्सप्रमाणेच लघु-मध्यम शेअर्सवरही (Share) दबाव राहिला. सेन्सेक्स(Sensex) 329 अंकांनी घसरून 57,788 वर बंद झाला तर निफ्टी 104 अंकांनी घसरून 17,221 वर बंद झाला. तर निफ्टी बँक 104 अंकांनी घसरून 36,790 वर बंद झाला.

बुधवारी सेन्सेक्सच्या 30 पैकी 21 शेअर्सची विक्री झाली तर निफ्टीच्या (Nifty)50 पैकी 34 शेअर्सची घसरण झाली. दुसरीकडे, निफ्टी बँकेच्या 12 पैकी 10 शेअर्सवर विक्रीचे वर्चस्व राहिले. बुधवारी डॉलरच्या तुलनेत रुपयाही 36 पैशांनी कमजोर होऊन 76.23 वर बंद झाला.24 एप्रिल 2020 नंतर रुपया खालच्या पातळीवर बंद झाला आहे.

यूएस फेड आपली आर्थिक धोरणे कडक करण्याच्या शक्यतेमुळे गुरुवारी भारतीय बाजारांवर दबाव होता असे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे (Geojit Financial Services) विनोद नायर म्हणाले. महागाईच्या दबावादरम्यान यूएस फेड लवकरच बाँड खरेदी प्रोग्राममध्ये कपात करण्याची घोषणा करेल अशी अपेक्षा आहे. याशिवाय 2022 मध्ये व्याजदरात वाढ करण्याचीही घोषणा केली जाऊ शकते असेही ते म्हणाले.

तांत्रिक दृष्टीकोन

निफ्टीने डेली स्केलवर बियरिश कँडल तयार केली आणि 100 दिवसांच्या SMA खाली बंद झाली. जोपर्यंत निफ्टी 17,350 च्या खाली राहील तोपर्यंत आणखी घसरणीची शक्यता असेल आणि तो 17,100 आणि 17,000 च्या दिशेने जाऊ शकतो असे मोतीलाल ओसवालचे चंदन तापडिया म्हणाले. तर वरच्या बाजूला यासाठी 17500 च्या दिशेने रझिस्टेंस आहे असेही ते म्हणाले.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

निफ्टी 17,200 च्या मजबूत सपोर्ट झोनच्या जवळ बंद झाला आहे आणि जर तो या पातळीच्या वर राहण्यात यशस्वी झाला तर आपण त्यात आणखी वाढ पाहू शकतो असे LKP सिक्युरिटीजचे रोहित सिंगरे म्हणाले. दुसरीकडे, जर निफ्टी 17200 च्या पातळीच्या खाली घसरला, तर 17100-17000 च्या पुढील सपोर्टकडे जाताना पाहू शकतो. वरच्या बाजूला, निफ्टीसाठी 17,300-17,400 च्या दिशेने रझिस्टेंस आहे. जर निफ्टीने ही पातळी तोडली तर आपण त्यात सकारात्मक ब्रेकआउट पाहू शकतो असेही सिंगरे म्हणाले.

निफ्टी 17,192 च्या खाली घसरताना दिसला तर आपण त्यात 17,050 ची पातळी देखील पाहू शकतो अशी माहिती GEPL कॅपिटलचे करण पै यांनी दिली.

आज कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल ?

बजाज फायनान्स (BAJFINANCE)

बजाज फिनसर्व्ह (BAJAJFINSV)

अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)

आयटीसी (ITC)

पॉवर ग्रीड (POWERGRID)

गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स (M&MFIN)

ग्लेन मार्क (GLENMARK)

कमिंस इंडिया (CUMMINSIND)

गुजरात गॅस (GUJGASLTD)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com