
शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये उतार
मुंबई : या आठवड्याच्या सुरुवातीला शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले होते; मात्र आठवड्याच्या दुसऱ्याच दिवशी सेन्सेक्स ३१५.४५ अंकांनी म्हणजेच ०.५९ टक्क्यांनी घसरला व ५२,८४०.९९ अंकांवर स्थिर झाला. निफ्टी ९२.४० अंकांनी म्हणजेच ०.५१ टक्क्यांनी घसरला व १५,७५४.८० अंकांवर स्थिर झाला.
दोन आठवड्यांपूर्वी पहिल्याच दिवशी सेन्सेक्स १००० अंकांनी कोसळला होता. त्यानंतर गेल्या आठवड्याच्या प्रारंभीस सेन्सेक्स आणि निफ्टीचे अंक वधारले होते. या आठवड्याच्या प्रारंभीसही ही स्थिती कायम राहिली. (Todays Share Market Updates)
काल शेअर बाजार तेजीसह बंद झाला होता. सेन्सेक्स ४३३.३० अंकानी वधारुन ५३,१६१.२८ वर बंद झाला तर निफ्टीतही १३२.८० अंकांची वाढ झालेली दिसली. निफ्टी १५,८३२.०५वर बंद झाला होता.
गेल्या काही आठवड्यांच्या घसरणीनंतर मागच्या आठवड्यात बाजार हिरव्या रंगात बंद झाल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान यांनी सांगितले. यातऑटो सेक्टरने महत्त्वाची भूमिका बजावली, तसेच वस्तूंच्या किमतीतही सुधारणा झाली आहे. दुसरीकडे, बीएसई मेटल, बीएसई एनर्जी आणि बीएसई ऑइल अँड गॅसने तुलनेने कमजोर प्रदर्शन केले.
Web Title: Stock Market Declines Decline In Sensex And Nifty
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..