Stock Market : या डिफेन्स स्टॉकचा मजबूत परतावा, आणखी तेजी येणार ?

मोठ्या ऑर्डर्ससह मजबूत आउटलुकमुळे शेअरला सपोर्ट मिळत आहे.
Stock Market
Stock Marketesakal

Stock Market : हिंदुस्तान एअरोनॉटिक्स (HAL) शेअर्समधील तेजी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सोमवारी बीएसईवर 7.44 टक्क्यांच्या मजबूत रॅलीसह हा शेअर 2,613.15 रुपयांवर बंद झाला आणि इंट्राडेमध्ये या शेअरने 2,639 रुपयांच्या विक्रमी उच्चांकाला स्पर्श केला. मोठ्या ऑर्डर्ससह मजबूत आउटलुकमुळे शेअरला सपोर्ट मिळत आहे. या वर्षात आतापर्यंत या शेअरने 112 टक्के मजबूत परतावा दिला आहे, तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्स या कालावधीत केवळ 1.7 टक्के मजबूत झाला आहे.

Stock Market
Stock Market : आज सेन्सेक्स 0.44 टक्क्यांच्या वाढीसह 57, 823 वर उघडला

मार्च 2018 मध्ये आला आयपीओ

एचएएलचा स्टॉक मार्च 2018 मध्ये शेअर बाजारात लॉन्च झाला होता. कंपनीने आयपीओद्वारे 1,215 रुपये प्रति शेअर दराने 4,113 कोटी रुपये उभारले होते. 24 मार्च 2020 रोजी स्टॉकने 448 रुपयांच्या विक्रमी नीचांकी पातळी गाठली होती, तेव्हापासून हा स्टॉक 475 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या सहा महिन्यांत या शेअरने 83 टक्क्यांचा मजबूत परतावा दिला आहे.

Stock Market
Stock Market : सेन्सेक्स ५५,८१६ तर निफ्टी १६,६४२ वर बंद; दोन दिवसांनी वाढ

कंपनी काय करते ?

हिंदुस्तान एरोनॉटिक्स (HAL) विमान, हेलिकॉप्टर, एअरोइंजिन, एव्हीओनिक्स, ऍक्सेसरीज आणि एअरोस्पेस स्ट्रक्चर्ससह अनेक उत्पादनांचे डिझाइन्स, डेव्हलपमेंट, मॅन्युफॅक्चरींग, रिपेअर, ओवरहॉल, अपग्रेड आणि सर्विसमध्ये गुंतलेली आहे. एअरोस्पेस क्षेत्रातील भारताच्या तिन्ही सैन्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कंपनीची निर्मिती करण्यात आली आहे.

Stock Market
Stock Market : सेन्सेक्स-निफ्टीची घसरण, तर टाटा स्टीलला सर्वाधिक लाभ

तेजसला अनेक देशांमध्ये मागणी

कंपनीच्या तेजस विमान आणि लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टरसारख्या उत्पादनांना भारताच्या सैन्यात तसेच मलेशिया, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेसारख्या देशांमध्ये मोठी मागणी आहे. त्यामुळे कंपनीला या उत्पादनांसाठी मोठ्या प्रमाणात ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा लष्करी आणि तिसरा सर्वात मोठा संरक्षण खर्च करणारा देश आहे. भारताच्या संरक्षण दलांनी केलेल्या खरेदीत सर्वाधिक वाटा HAL ला मिळेल अशी अपेक्षा आहे.

Stock Market
Stock market closing update : शेअर बाजार घसरणीसह बंद

याशिवाय भारतीय संरक्षण दलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एचएएल विशेष प्रकारची जेट विमाने बनवण्याचे काम करत आहे. अलीकडील मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (Artificial Intelligence) आधारित मल्टीरोल ऍडव्हांस आणि लांब पल्ल्याच्या ड्रोनच्या विकासावरही काम करत आहे.

Stock Market
Stock Market : सेन्सेक्स-निफ्टीची घसरण, तर टाटा स्टीलला सर्वाधिक लाभ

एचएएलच्या शेअर्सना 2860 रुपयांच्या टारगेटसह "बाय" रेटिंग दिले आहे. कंपनीकडे 82,200 कोटी रुपयांची ऑर्डर बुक आहे, जी आर्थिक वर्ष 2022 च्या कमाईच्या 3.3 पट आहे. कंपनीला विमान आणि हेलिकॉप्टरच्या मोठ्या ऑर्डर मिळाल्या आहेत. याशिवाय मेंटेनन्स, रिपेअरिंग आणि ओव्हरहॉल सेगमेंटची ऑर्डर पाइपलाइनही खूप मजबूत आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com