Budget 2020 : अर्थसंकल्पापूर्वीच शेअर बाजारात घसरण

वृत्तसंस्था
Saturday, 1 February 2020

बाजार सुरु होताच मुंबई शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये घसरण झाली होती.

अर्थसंकल्प 2020 : नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (शनिवार) थोड्याच वेळात केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. शनिवारी अर्थसंकल्प सादर होणार असल्याने आज शेअर बाजार देखील खुले ठेवण्यात आले आहेत. बाजार सुरु होताच मुंबई शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये घसरण झाली होती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सेन्सेक्समध्ये बाजार सुरु होताच १२६ अंशाची घसरण झाली होती. मात्र बाजार आता सावरला असून निर्देशांक सकारात्मक व्यवहार करत आहेत. 

सेन्सेक्समध्ये  81.38 अंशांची वाढ झाली असून तो सध्या 40 हजार 804 अंशांवर व्यवहार करतो आहे. तर निफ्टीमध्ये 19.15 अंशांची वाढ झाली आहे. तो  सध्या 11 हजार 981 अंशांवर व्यवहार करतो आहे.

Budget 2020:स्वातंत्र्यानंतरचं पहिलं बजेट कोणी सादर केलं?

लाल चोपडीतला अर्थसंकल्प 
2019 मधला अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी सीतारामन यांच्या हातात लाल कापडात गुंडाळून आणलेला अर्थसंकल्प बघून मोठ्या प्रमाणत चर्चा झाली होती. यावेळी त्यांच्याकडे 'ब्रिफकेस' नसल्याने अनेकांना आश्चर्य वाटले होते. यावर्षीही सकाळी सकाळी सीतारामन व केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी लाल चोपडी घेऊनच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Stock Market Plummeted Before The Budget 2020