आठवड्याच्या प्रारंभी शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स आणि निफ्टी वधारला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sensex

आठवड्याच्या प्रारंभी शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स आणि निफ्टी वधारला

मुंबई : या आठवड्याच्या सुरुवातीला शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. सेन्सेक्स ६४९.०५ अंकांनी म्हणजेच १.१७ टक्क्यांनी वधारला व ५३,३५१.१६ अंकांवर स्थिर होत बाजार सुरू झाला. निफ्टी १९१.३० अंकांनी म्हणजेच १.२२ टक्क्यांनी वधारला व १५,८८२.३० अंकांवर स्थिर झाला.

दोन आठवड्यांपूर्वी पहिल्याच दिवशी सेन्सेक्स १००० अंकांनी कोसळला होता. त्यानंतर गेल्या आठवड्याच्या प्रारंभीस सेन्सेक्स आणि निफ्टीचे अंक वधारले होते. या आठवड्याच्या प्रारंभीसही ही स्थिती कायम राहिली. (Todays Share Market Updates)

शुक्रवारी बाजारात चांगलीच तेजी दिसून आली. ऑटो, मेटल आणि एफएमसीजी शेअर्समध्ये चांगली खरेदी दिसून आली. आयटी सोडून सर्व सेक्टरमधील इंडेक्स वाढीने बंद झाले. बँक, ऑइल अँड गॅस आणि पॉवर शेअर्समध्ये खरेदी दिसून आली.

सेन्सेक्स 462 अंकांच्या वाढीसह 52728 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 143 अंकांवर चढून 15699 वर बंद झाला आहे. निफ्टी बँक 492 अंकांनी वाढून 33,627 वर बंद झाला. मिडकॅप 370 अंकांनी वाढून 26449 वर बंद झाला आहे.

गेल्या काही आठवड्यांच्या घसरणीनंतर मागच्या आठवड्यात बाजार हिरव्या रंगात बंद झाल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान यांनी सांगितले. यातऑटो सेक्टरने महत्त्वाची भूमिका बजावली, तसेच वस्तूंच्या किमतीतही सुधारणा झाली आहे. दुसरीकडे, बीएसई मेटल, बीएसई एनर्जी आणि बीएसई ऑइल अँड गॅसने तुलनेने कमजोर प्रदर्शन केले.

Web Title: Stock Market Rally Early In The Week Sensex And Nifty Rise

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top