esakal | Share Market: गुरुवारी शेअर बाजारात वाढ, आज कोणत्या शेअर्सवर ठेवाल नजर?
sakal

बोलून बातमी शोधा

Stock market

शेअर बाजारात आज अर्थात आठवड्याच्या शेवटच्या दिवशी तेजी कायम राहण्याचा अंदाज

गुरुवारी शेअर बाजारात वाढ, आज कोणत्या शेअर्सवर ठेवाल नजर?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसंस्था

- शिल्पा गुजर

गुरुवारी ऑटो आणि रिअल्टी शेअर्समधील जोरदार खरेदीच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजार वाढीसह बंद झाला. सेन्सेक्स 488.10 अंक अर्थात 0.82% वाढून 59,677.83 वर तर निफ्टी 144.30 अंक अर्थात 0.82% वाढून 17,790.30 वर बंद झाला.

सेन्सेक्सच्या शेअर्समध्ये 10 टक्क्यांहून अधिक वाढ झाली, तर टायटनच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली. याशिवाय, महिंद्रा अँड महिंद्रा, मारुती, इंडसइंड बँक, एशियन पेंट्स, सन फार्मा, एचसीएल टेक, टीसीएस, टेक महिंद्रा आणि आयसीआयसीआय बँकचे शेअर्ससुद्धा तेजीत राहिले.

नुकसानीत राहिले हे शेअर्स

डॉ.रेड्डीज, एचडीएफसी, बजाज फिनसर्व, नेस्ले इंडिया आणि एचयूएलचे शेअर्स तोट्यात आहेत. डॉ रेड्डीचे शेअर्स 1.31 टक्के, एचडीएफसीचे शेअर्स 0.71 टक्के, नेस्ले इंडियाचे शेअर 0.64 टक्के, बजाज फिनसर्वचे शेअर 0.59 टक्के, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचे शेअर 0.51 टक्के, एनटीपीसीचे शेअर्स 0.42 टक्के, अॅक्सिस बँकेचे शेअर्स 0.26 टक्के, एचडीएफसी बँकेचे शेअर्स 0.24 वर तर कोटक महिंद्रा बँक 0.18 टक्के आणि अल्ट्राटेक सिमेंट 0.15 टक्क्यांनी घसरले.

आज कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल ?

टाटा मोटर्स (Tata Motors)

टायटन कंपनी (Titan Company)

पेज इंडस्ट्रिज (Page Industries)

ऑबेरॉय रियल्टी (Oberoi Realty)

गोदरेज प्रॉपर्टीज (Godrej Prop)

बंधन बँक (Bandhan Bank)

बाटा इंडिया (Bata India)

ट्रेंट (Trent)

इंडिया हॉटेल्स (Indian Hotels)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

loading image
go to top