ऐतिहासिक ट्रॅक रेकॉर्ड असलेले दमदार स्टॉक, तुमचा पोर्टफोलिओ होईल मालामाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऐतिहासिक रेकॉर्ड असलेले दमदार स्टॉक, तुम्ही व्हाल मालामाल!

ऐतिहासिक रेकॉर्ड असलेले दमदार स्टॉक, तुम्ही व्हाल मालामाल!

- शिल्पा गुजर


आज आपण ऐतिहासिक ट्रॅक रेकॉर्ड असणाऱ्या शेअर्सबाबत जाणून घेणार आहोत. एमओएफएसएलचे (MOFSL) हेमंग जानी, ट्रॅकॉम स्टॉक ब्रोकर्सचे (TRACOM STOCK BROKERS) पार्थिव शाह, विल्यम ओ नीलचे (WILLIAM O NEIL) मयुरेश जोशी, बाजार तज्ज्ञ अंबरीश बलिगा आणि निर्मल बंगचे (Nirmal Bang) राहुल अरोरा यांच्याकडून या स्टॉकबाबत जाणून घेणार आहोत.

हेमांग जानी यांनी सांगितलेला नफ्याचा स्टॉक - PIRAMAL ENT

3100 रुपयांचे लक्ष्य ठेवून पिरामल एंटरप्रायजेसचे(Piramal Enterprises) शेअर्स खरेदी करा असा सल्ला हेमांग जानी यांनी दिला आहे. कंपनीचा कॉन्सो नफा दरवर्षी 8% वाढून 530 कोटी रुपये झाला. फार्मा विभागात वार्षिक 30 टक्क्यांची मजबूत वाढ दिसून आली. पुढच्या 3 वर्षात किरकोळ क्षेत्रात चांगली कामगिरी अपेक्षित असल्याचा विश्वास हेमांग जानी यांनी वर्तवला आहे.

हेही वाचा: कोहली पाठोपाठ शास्त्री गुरुजींनी दिले कोच पदावरुन हटण्याचे संकेत

पार्थिव शाह यांनी सांगितलेला नफ्याचा स्टॉक - टाटा मोटर्स (Tata Motors)

ही कंपनी घरगुती इलेक्ट्रिक व्हेइकल सेगमेंटमध्ये मार्केट लीडर आहे. कंपनी अनेक इलेक्ट्रिक वाहने लाँच करण्याची तयारी करत आहे. पॅसेंजर व्हेईकल सेगमेंटमध्येही कंपनीचा मार्केट शेअर वाढला आहे. त्याच वेळी, पीव्ही मधील मार्केट शेअर वार्षिक 6% वरून 10% पर्यंत वाढला आहे. त्यामुळेच हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला पार्थिव यांनी दिला आहे.

अंबरीश बलिगा यांनी सांगितलेला नफ्याचा स्टॉक - कोटक बँक (Kotak Bank)

ही देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकांपैकी एक आहे. सध्या बँकेच्या 1612 शाखा, 2591 एटीएम आहेत. दरमहा 5 लाख ग्राहक डिजिटल पद्धतीने जोडले जात आहेत. घाऊक, व्यावसायिक, ग्राहक बँकिंग व्यतिरिक्त, बँक संपत्ती व्यवस्थापन, स्टॉक ब्रोकिंग, विम्यामध्येही गुंतलेली आहे. या बँकेचा CASA रेश्यो 60.2%, CAR 23.7% आहे. त्याची एकूण ग्राहक संपत्ती 2.64 लाख कोटी आहे. बँकेचा NPA 3.58% आणि NNPA 1.34% असल्याची माहिती अंबरीश यांनी दिली.

हेही वाचा: सहकारी बँकांवर केंद्र सरकारची 'दादागिरी'; अजित पवारांनी दिली तंबी

मयुरेश जोशी यांनी सांगितलेला नफ्याचा स्टॉक - टाटा पॉवर (Tata Power)

175 रुपयांच्या टार्गेटसाठी 128.50 रुपयांवर स्टॉप लॉस लावत हा स्टॉक खरेदी करायचा सल्ला मयुरेश जोशींनी दिली आहे. ही कंपनी वीज निर्मिती, प्रसारण आणि वितरणाच्या व्यवसायात आहे. ईपीसी व्यवसाय आणि ओडिशा उपकंपनींमुळे चांगला पाठिंबा मिळत आहे. कंपनीची ग्रीन एनर्जीमध्ये आहे आणि यात बरीच वाढ होण्याची शक्यता आहे. यासह, इलेक्ट्रिक व्हेइकल इन्फ्रापासूनही वाढ होईल असे मयुरेश जोशी म्हणाले.

प्रकाश दिवाण यांनी सांगितलेला नफ्याचा स्टॉक – आयटीसी (ITC)

गेल्या काही दिवसांपासून हा स्टॉक तेजी दाखवत आहे आणि त्यात खरेदी करण्याचा सल्ला प्रकाश दिवाण यांनी दिला आहे. या कंपनीला वेगवेगळ्या व्यवसायाचा लाभ मिळेल. ही कंपनी सिगारेट, एफएमसीजी, पेपर आणि हॉटेल्सच्या व्यवसायात आहे. कंपनीच्या सिगारेट वॉल्यूममध्ये चांगली सुधारणा आहे. त्याच वेळी, कोविडमुळे हॉटेल व्यवसायात मंदी आहे अशी माहिती प्रकाश यांनी दिली.

हेही वाचा: सहकारी बँकांवर केंद्र सरकारची 'दादागिरी'; अजित पवारांनी दिली तंबी

राहूल अरोरा यांनी सांगितलेला नफ्याचा स्टॉक - जुबिलियंट फूड (JUBILANT FOOD)

हा स्टॉक खरेदी करायचा सल्ला राहुल यांनी दिला आहे. कंपनीचे लक्ष व्यवसाय वैविध्यतेवर (Diversification) आहे. आता कंपनीने बिर्याणी आणि चायनीज फूडमध्येही प्रवेश केला आहे. सध्या वेस्टर्न फास्ट फूड मार्केटची किंमत सुमारे 15,000 कोटी रुपये आहे. यापुढेही वेस्टर्न फास्ट फूड मार्केट वेगाने पसरणार आहे. त्याचा ईपीएस दोन वर्षात तिप्पट होऊ शकतो. कंपनी विस्तारासाठी अधिग्रहण करत आहे. डोमिनोज स्टोअरचा विस्तार करण्यावर कंपनीचा भर आहे आणि सध्या त्याची 1400 स्टोअर्स आहेत. याशिवाय, कंपनीने बार्बेक्यू नेशनमध्येही गुंतवणूक केली आहे. एफआयआयचीही कंपनीमध्ये गुंतवणूक आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Web Title: Strong Stocks With Historical Track Record Your Portfolio Will Be

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Share Marketportfolio
go to top