डिजिटल लाइफ सर्टिफिकेट

निवृत्तीवेतन मिळणाऱ्या व्यक्तीस आपले सेवानिवृत्ती वेतन पुढे चालू राहावे, यासाठी दरवर्षी ३० नोव्हेंबरच्या आत हयातीचा दाखला (लाइफ सर्टिफिकेट) सादर करावा लागतो.
Sudhakar Kulkarni writes person who receiving a pension to show Digital Life Certificate
Sudhakar Kulkarni writes person who receiving a pension to show Digital Life Certificatesakal
Summary

निवृत्तीवेतन मिळणाऱ्या व्यक्तीस आपले सेवानिवृत्ती वेतन पुढे चालू राहावे, यासाठी दरवर्षी ३० नोव्हेंबरच्या आत हयातीचा दाखला (लाइफ सर्टिफिकेट) सादर करावा लागतो. खासगी क्षेत्रातील सेवानिवृत्त व्यक्तीस कर्मचारी भविष्यनिर्वाह संस्थेमार्फत सेवानिवृत्तीवेतन मिळत असते व त्यांना वर्षभरात केव्हाही हयातीचा दाखला देता येतो.

निवृत्तीवेतन मिळणाऱ्या व्यक्तीस आपले सेवानिवृत्ती वेतन पुढे चालू राहावे, यासाठी दरवर्षी ३० नोव्हेंबरच्या आत हयातीचा दाखला (लाइफ सर्टिफिकेट) सादर करावा लागतो. खासगी क्षेत्रातील सेवानिवृत्त व्यक्तीस कर्मचारी भविष्यनिर्वाह संस्थेमार्फत सेवानिवृत्तीवेतन मिळत असते व त्यांना वर्षभरात केव्हाही हयातीचा दाखला देता येतो. हयातीचा दाखला दिल्याच्या तारखेपासून पुढील एक वर्ष वैध असतो. सेवानिवृत्त व्यक्तीला बऱ्याचदा प्रत्यक्ष बँकेत अथवा पोस्टात किंवा ट्रेझरी ऑफिसमध्ये जाऊन वेळेत हयातीचा दाखला देणे शक्य होत नाही किंवा खूप जिकीरीचे असते.

विशेषत: वय जास्त असेल किंवा शारीरिक स्थिती बिघडलेली असेल तर हा प्रश्न आणखीनच जटील होऊन जातो. जर हयातीचा दाखला वेळेत दिला गेला नाही, तर पुढील महिन्यापासून पेन्शन मिळण्याचे थांबते. या समस्येवर उपाय म्हणून केंद्र सरकारने सेवानिवृत्तीधारकांना हयातीचा दाखला ऑनलाईन देण्याची सुविधा नुकतीच उपलब्ध करून दिली आहे. यासाठी ‘फेस रेकग्निशन टेक्नॉलॉजी’चा वापर केला जाणार असून, याद्वारे सेवानिवृत्त व्यक्ती घरबसल्या आपल्या मोबाईल अॅपद्वारे आपल्या सोयीनुसार हयातीचा दाखला ऑनलाईन देऊ शकणार आहे.

ही सुविधा इलेक्ट्रॉनिक्स् आणि इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी मंत्रालय व युआयडीआय (युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडिया) यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित केली असून, वापरण्यास अगदी सहज व सोपी आहे. कशी ते आता पाहू-

आपल्या मोबाईलवर आधारफेस आरडीअॅप डाउनलोड करा व नेहमीप्रमाणे अॅपसाठीचे आवश्यक असणारे रजिस्ट्रेशन (नोंदणी) करा.

https://jeevanpramaan.gov.in/package/download या लिंकवर जाऊन जीवन प्रमाण फेस ॲप्लिकेशन डाऊनलोड करा व आपल्या मोबाईलवरील अॅपवर क्लायंट इन्स्टॉलेशन डॉक्युमेंटवर क्लिक करा. इन्स्टॉलेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आपल्याला ऑपरेटर आॅथेंटिकेशन स्क्रीन दिसेल.

ऑपरेटर आॅथेंटिकेशन स्क्रीनवर आपला आधार नंबर, मोबाईल नंबर व मेल आयडी ही माहिती भरा व आपल्या मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून सबमिट करा.

आता आपला चेहरा ऑपरेटर आॅथेंटिकेशन स्क्रीनवर स्कॅन करा. आपला स्कॅन व्यवस्थित झाल्यावर क्लायंट रजिस्ट्रेशन सक्सेसफुल असा मेसेज येईल. ही प्रक्रिया एकदाच व सुरवातीला करावी लागेल.

जेव्हा आपल्याला हयातीचा दाखला द्यायचा असेल, तेव्हा अॅपवरील पेन्शनर आॅथेंटिकेशनवर पूर्ण नाव, आधार नंबर, पीपीओ नंबर, पेन्शन मंजूर करणारी, पेन्शन खाते नंबर ही माहिती भरून आपला चेहरा स्कॅन करावा. यावेळी आपला चेहरा सरळ ठेवावा व स्क्रीनवरील सूचनांनुसार कार्यवाही करावी व अखेरीस प्रोसिडवर क्लीक करावे.

आपले फेस रेकग्निशन यशस्वी झाल्यावर आपला पीपीओ नंबर व प्रमाण आयडी स्क्रीनवर दिसून, आपला हयातीचा दाखला (डिजिटल लाईफ सर्टिफिकेट) मिळाले असल्याचे दर्शविले जाते. आपण हवे तर याचा स्क्रीन शॉट घेऊन आपल्याकडे ठेऊ शकता.

वरील प्रक्रिया सकृतदर्शनी जरी किचकट वाटत असली तरी ज्याप्रमाणे आपण एखादे अॅप मोबाईलवर डाउनलोड करू सहजगत्या वापरतो, त्याचप्रमाणे एकदा सुरवातीला आपल्या मोबाईलवर आधारफेस आरडीअॅप डाउनलोड करा व नेहमीप्रमाणे अॅपसाठीचे आवश्यक असणारे रजिस्ट्रेशन (नोंदणी) करून पुढे दरवर्षी आपल्या हयातीचा दाखला डिजिटली आवश्यक तेव्हा सादर करू शकाल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com