"पॉझिटिव्ह पे'ने होईल सकारात्मक बदल! 

सुधाकर कुलकर्णी 
Monday, 24 August 2020

सध्या बॅंकेमध्ये रु. 50 हजारांवरील दिल्या जाणाऱ्या चेकचे प्रमाण 20 टक्के आहे. मात्र, यातून होणारे पेमेंट एकूण होणाऱ्या पेमेंटच्या सुमारे 80 टक्के असल्याने "पॉझिटिव्ह पे' या सुविधेमुळे चेक पेमेंटच्या फ्रॉडचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होईल किंबहुना जवळजवळ होणारच नाही. 

मध्यंतरी पतधोरण जाहीर करताना रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी "पॉझिटिव्ह पे' ही सुविधा बॅंक खातेदारांना देऊ केली आहे. काय आहे ही सुविधा व यामुळे खातेदारांना नेमका काय फायदा होईल, हे आपण पाहूया. 

कशी आहे सुविधा? 
- या सुविधेनुसार खातेदार आपला चेक देण्यापूर्वी (इश्‍यू करण्यापूर्वी) चेकचा तपशील (पेयीचे नाव, चेकची रक्कम व तारीख) आपल्या बॅंकेस देऊ शकणार आहे व यासाठी चेकचा फोटो काढून तो आपल्या बॅंकेच्या मोबाईल ऍपवर अपलोड करायचा आहे. यासाठी खातेदाराने आपल्या बॅंकेचे मोबाईल ऍप वापरणे आवश्‍यक असणार आहे. 

- ही सुविधा सध्या रु. 50 हजार व त्यावरील रकमेच्या चेकसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. असा चेक जेव्हा पेमेंट क्‍लिअरिंगसाठी अथवा अन्य मार्गाने आपल्या बॅंकेकडे येईल, तेव्हा आपण दिलेल्या चेकचा तपशील व आलेला चेक याची पडताळणी केली जाईल. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

- आपण दिलेली माहिती व प्रत्यक्ष चेकवरील माहिती तंतोतंत सारखी असेल तरच आपली बॅंक आपण दिलेल्या चेकचे पेमेंट करेल. माहितीत तफावत आढळल्यास बॅंकेकडून तो चेक पेमेंट न करता परत केला जाईल. यामुळे आपण दिलेल्या चेकमध्ये कोणीही नावात किंवा रकमेत फेरफार केली तरी आपण दिलेल्या तपशिलाशी चेकचा तपशील जुळणार नसल्याने चेकचा गैरवापर होऊ शकणार नाही. 

- सध्या बॅंकेमध्ये रु. 50 हजारांवरील दिल्या जाणाऱ्या चेकचे प्रमाण 20 टक्के आहे. मात्र, यातून होणारे पेमेंट एकूण होणाऱ्या पेमेंटच्या सुमारे 80 टक्के असल्याने "पॉझिटिव्ह पे' या सुविधेमुळे चेक पेमेंटच्या फ्रॉडचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होईल किंबहुना जवळजवळ होणारच नाही. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

- आता आपण रु. 50 हजारांपुढील रकमेचा चेक देताना ही सुविधा अवश्‍य वापरून आपले चेक पेमेंट सुरक्षित होईल, याची काळजी घ्यावी. 

(लेखक सर्टिफाईड फायनान्शिअल प्लॅनर - सीएफपी आहेत.) 

पुणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sudhar kulkarni article about positive pay

Tags
टॉपिकस
Topic Tags: