स्विफ्ट, डिझायर मोटारी मारुतीने परत बोलावल्या 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जुलै 2018

नवी दिल्ली - देशातील आघाडीची मोटार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने नव्या स्विफ्ट आणि डिझायर या दोन मॉडेलच्या १ हजार २७९ मोटारी परत बोलाविल्या आहेत. या मोटारींच्या एअरबॅग कंट्रोल युनिटमधील दोषाची तपासणी करण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एअरबॅग कंट्रोल युनिटमध्ये दोष असल्याने त्या उघडत नसल्याचे समोर आले आहे. नव्या स्विफ्ट ५६६ मोटारी आणि नव्या डिझायर ७१३ मोटारी अशा एकूण १ हजार २७९ मोटारी परत बोलाविण्यात आल्या आहेत. या मोटारी ७ मे ते ५ जुलै या कालावधीत उत्पादित झालेल्या आहेत. या मोटारींच्या मालकांना २५ जुलैपासून कंपनीचे वितरक संपर्क करण्यास सुरवात करतील.

नवी दिल्ली - देशातील आघाडीची मोटार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने नव्या स्विफ्ट आणि डिझायर या दोन मॉडेलच्या १ हजार २७९ मोटारी परत बोलाविल्या आहेत. या मोटारींच्या एअरबॅग कंट्रोल युनिटमधील दोषाची तपासणी करण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एअरबॅग कंट्रोल युनिटमध्ये दोष असल्याने त्या उघडत नसल्याचे समोर आले आहे. नव्या स्विफ्ट ५६६ मोटारी आणि नव्या डिझायर ७१३ मोटारी अशा एकूण १ हजार २७९ मोटारी परत बोलाविण्यात आल्या आहेत. या मोटारी ७ मे ते ५ जुलै या कालावधीत उत्पादित झालेल्या आहेत. या मोटारींच्या मालकांना २५ जुलैपासून कंपनीचे वितरक संपर्क करण्यास सुरवात करतील. कंपनी या मोटारींची तपासणी करून त्यातील दोष मोफत दूर करणार आहे.  नवी दिल्लीत फेब्रुवारीमध्ये झालेल्या ऑटो एक्‍स्पोत नवी स्विफ्ट सादर करण्यात आली होती. डिझायर मोटार गेल्या उन्हाळ्यात सादर करण्यात आली होती.

ग्राहकांना त्यांच्या मोटारीत दोष आहे, की याची माहिती कंपनीच्या संकेतस्थळावरही चेसी क्रमांक देऊन मिळेल. याचसोबत वितरकाकडे चौकशी केल्यासही याची माहिती त्यांना मिळेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: swift dzire vehicle maruti suzuki