PMJDY | जनधन खात्यात पैसे नाही? तरीही मिळणार 10 हजार रुपये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जनधन खात्यात पैसे नाही? तरीही मिळणार 10 हजार रुपये

जनधन खात्यात पैसे नाही? तरीही मिळणार 10 हजार रुपये

sakal_logo
By
ओमकार वाबळे

सहसा, बचत बँक खात्यात खातेदाराला दर महिन्याला किमान शिल्लक ठेवावी लागते. तसं न केल्यास दंड भरावा लागतो. पगार खात्यासाठी हे बंधनकारक नाही. पण, यासोबतच अशी काही खाती आहेत, जिथे किमान शिल्लक ठेवण्याची गरज नाही. प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY) हे देखील अशाच खात्यांपैकी एक आहे.

याशिवाय जन धन योजना खात्यात अनेक सुविधाही उपलब्ध आहेत. केंद्र सरकार प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY) अंतर्गत झीरो बॅलंस बचत खाते उघडते. यामध्ये अपघात विमा, ओव्हरड्राफ्ट सुविधा, चेकबुकसह इतर अनेक फायदेही मिळतात.

जाणून घ्या कसे मिळवायचे 10 हजार रुपये

जन धन योजनेंतर्गत, तुमच्या खात्यात शिल्लक नसली तरीही, 10,000 रुपयांपर्यंतच्या ओव्हरड्राफ्टची सुविधा उपलब्ध आहे. ही सुविधा अल्प मुदतीच्या कर्जासारखी आहे. पूर्वी ही रक्कम ५ हजार रुपये होती. सरकारने ती आता 10 हजारांपर्यंत वाढवली आहे.

'हा' नियम आहे

या खात्यातील ओव्हरड्राफ्ट सुविधेसाठी कमाल वयोमर्यादा ६५ वर्षे आहे. ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुमचे जनधन खाते किमान ६ महिने जुने असावे. नसल्यास, फक्त 2,000 रुपयांपर्यंतचा ओव्हरड्राफ्ट उपलब्ध आहे.

loading image
go to top