esakal | TATA मोटर्सच्या शेअर्सची कोटीच्या कोटी उड्डाणे
sakal

बोलून बातमी शोधा

Tata Motors

TATA मोटर्सच्या शेअर्सची कोटीच्या कोटी उड्डाणे

sakal_logo
By
टीम ई सकाळ

टाटा मोटर्सचे शेअर्स अतिशय मजबूत स्थितीत दिसत आहेत. मंगळवारी अर्थात 12 ऑक्टोबरच्या व्यापारात त्यांनी एनएसईवर 52 आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला. त्याचबरोबर गेल्या 5 व्यापारी सत्रांमध्ये हे शेअर्स सुमारे 23 टक्के तेजीत असून, त्यात मंगळवारच्या किंचित वाढीचाही समावेश आहे. कंपनीच्या इलेक्ट्रिक वाहन व्यवसायाला नवीन गुंतवणूकदार मिळाल्याच्या बातमीमुळे या शेअर्सने जोर पकडल्याचे अंबित कॅपिटलचे Ambit Capital ) ऑटो ऍनालिस्ट बासुदेब बॅनर्जी म्हणत आहेत.

खासगी इक्विटी ग्रुप टीपीजी टाटा मोटर्स इव्ही व्यवसायात 1 अब्ज डॉलर्स गुंतवणूक करण्याची चर्चा आता खूप पुढेपर्यंत आल्याचे सुत्रांनी सांगितले. या गुंतवणुकीसाठी कंपनीच्या ईव्ही विभागाचे मूल्यांकन 8-9 अब्ज डॉलरपर्यंत वाढवण्यात आल्याचे सुत्रांकडून समजते आहे.

स्टॉकच्या हलिया री-रेटिंगचे मोठे श्रेय ईव्ही व्यवसायाच्या अंदाजित मूल्यांकनाला जाते असे बासुदेब बॅनर्जी म्हणत आहेत. येत्या काही दिवसांत कंपनीच्या ईव्ही व्यवसायाच्या प्रगतीवर गुंतवणूकदारांचे लक्ष असेल.

टाटा मोटार समूहाच्या ग्लोबल होलसेलमध्ये सप्टेंबरमध्ये वार्षिक आधारावर 24 टक्क्यांची वाढ बघायला मिळाली. यात जेएलआरच्या विक्रीचा समावेश आहे. सप्टेंबर 2021 च्या तिमाहीत जेएलआरची विक्री सेमीकंडक्टरच्या शॉर्टेजमुळे अडचणीत होती असे टाटा मोटर्सने शुक्रवारी आपल्या निवेदनात म्हटले आहे. ही विक्री जुलैच्या मार्गदर्शनाच्या अनुषंगाने आहे.

सेमीकंडक्टर कमतरतेची समस्या टाटा मोटर्सच्या मीडियम टर्मसाठी मोठे आव्हान आहे. पण चांगली गोष्ट म्हणजे या आघाडीवर चांगली सुधारणा झाली आहे. भारतीय व्यावसायिक आणि प्रवासी वाहन विभागासाठी परिस्थिती सुधारत असल्याचे दिसते.

चांगल्या प्रॉडक्ट मिक्समुळे जेएलआरमध्ये सिक्लिकल रिकव्हरी दिसते आहे. मात्र, सप्लायबाबत समस्येमुळे वसुलीची प्रक्रिया थोडी पुढे ढकलली जाऊ शकते. कंपनीचा जेएलआर बिझनेसला कोणताही मोठा पाठिंबा नसला, तरी भारतीय व्यवसायात रिकव्हरी सुरुच राहील असे मोतीलाल ओसवाल यांच्या अहवालात म्हटले आहे. टाटा मोटर्ससाठी मोतीलाल ओसवालचे SoTP आधारित लक्ष्य प्रति शेअर ४६० रुपये आहे. आजच्या व्यापारात टाटा मोटर्सचा स्टॉक एनएसईवर 5.10 रुपये म्हणजेच 1.23 टक्क्यांनी वाढून 420.85 रुपयांवर बंद झाला.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

loading image
go to top