esakal | अर्थसाह्यासाठी जे अँड के बँकेसोबत टाटा मोटर्सचे सहकार्य
sakal

बोलून बातमी शोधा

Tata Motors

अर्थसाह्यासाठी 'जे अँड के' बँकेसोबत 'टाटा मोटर्स'चे सहकार्य

sakal_logo
By
कृष्णा जोशी

मुंबई : वाहनकर्जपुरवठ्यासाठी (Vehicle Loan) टाटा मोटर्सने (Tata Motors) जे अँड के बँकेसोबत ( J And K Bank) सहकार्य केले असून यात वाहनखरेदीसाठी आकर्षक दराने कर्जपुरवठा केला जाईल. यासंदर्भातील सामंजस्य करार दोन वर्षांचा असून त्यामुळे ग्राहकांना (Cusumers) सुलभ प्रकारे अर्थसाह्य मिळेल. टाटा मोटर्सच्या व्यावसायिक वाहनांच्या आणि ट्रक च्या खरेदीसाठी यात विशेष ऑफर (Special Offer) आहेत. ट्रकच्या खरेदीवर विशेष पॉईंट्स मिळतील तर लहान व्यावसायिक वाहनांसाठी विशेष वाहन देखभाल कार्यक्रम असेल. या बँकेच्या जम्मू काश्मीर (Jammu kashmir) वगळता उर्वरित देशात साडेनऊशेहून अधिक शाखा आहेत. या सहकार्यामुळे ग्राहकांचा लाभ होईलच आणि जम्मू काश्मीरच्या विकासाला हातभार लागेल, असे टाटा मोटर्सच्‍या कमर्शियल व्हेकल बिझनेस युनिटचे कार्यकारी संचालक व अध्‍यक्ष गिरीश वाघ म्‍हणाले. ( Tata Motors helps financial conditions to J And K Bank)

loading image