'टाटा मोटर्स'कडून वाहनांच्या किंमतीत वाढ 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 मार्च 2018

मुंबई: टाटा मोटर्सने आपल्या प्रवासी वाहनांच्या किंमती 60 हजार रुपयांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. कच्च्या मालाच्या किंमती मोठ्या प्रमाणावर वाढल्याने कंपनीचा उत्पादन खर्च वाढत आहे. हा खर्च भरुन काढण्यासाठी वाहनांच्या किंमती वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीने सांगितले आहे. नवीन किंमती 1 एप्रिल, 2018 पासून लागू होणार आहेत. 

"आम्ही आमच्या प्रवासी वाहनांच्या किंमती 60 हजार रुपयांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. उत्पादन खर्च वाढल्याने नुकसान भरुन काढण्यासाठी वाहनांच्या किंमती वाढविण्यात आल्या आहेत. मात्र किंमती वाढविल्यामुळे आमच्या विक्रीवर कोणताही परिणाम होणार नाही. शिवाय येत्या वर्षात टिआगो, टिगोर आणि नेक्सन या नवीन दमाच्या वाहनांची चांगली विक्री होण्याची अपेक्षा आहे ", अशी माहिती टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहन विभागाचे अध्यक्ष मयांक पारीख यांनी दिली. या महिन्यात ऑडीने देखील वाहनांच्या किंमतीत वाढ केली आहे. त्यांनी वाहनांच्या किंमीती 1 लाख रुपये ते 9 लाख रुपयांपर्यंत वाढविल्या आहेत. 

Web Title: Tata Motors to increase prices of its Passenger Vehicles by upto INR 60,000

टॅग्स