
TATA Motorsची इलेक्ट्रिक वाहनांमध्ये 15,000 कोटींची गुंतवणूक
टाटा मोटर्स पुढील चार वर्षांत 10 नवीन इलेक्ट्रिक वाहने लॉन्च करण्यासाठी 2 अब्ज डॉलर्स (15,000 कोटी रुपये) गुंतवणूक करणार आहे. पॅसेंजर व्हेइकल डिव्हिजन मार्फत ही प्रक्रिया पार पडणार आहे. हा विभाग आतापर्यंत तोट्यात होता. मात्र, या निर्णयानंतर 2022,23 पर्यंत रोख निर्मितीची प्रक्रिया सुरळीत होईल, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
खासगी इक्विटी फर्म टीपीजी राइज क्लायमेटने टाटा मोटर्सच्या पॅसेंजर इलेक्ट्रिक वेहिकल डिव्हिजनमध्ये 9.1 अब्ज डॉलर्सच्या मूल्यांकनासाठी 1 अब्ज डॉलर्स जमा करण्याची योजना जाहीर केली. त्यानंतर काही दिवसांतच हे पाऊल उचलण्यात आले.
टाटा मोटर्सच्या पॅसेंजर वेहिकल बिझनेस युनिटचे अध्यक्ष शैलेश चंद्रा म्हणाले की, कंपनीकडे इलेक्ट्रिकसाठी एक मजबूत उत्पादन लाँच करणार आहे. यामध्ये ग्रीन पॉवरट्रेनमार्फत येत्या चार-पाच वर्षांमध्ये 20 टक्क्यांनी विक्रीत वाढ होईल.
सप्टेंबरमध्ये, कंपनीने म्हटले होते की इलेक्ट्रिक्सची एकत्रित विक्री 10,000 युनिट्सच्या पुढे गेली आहे. यामध्ये मुख्य योगदान नेक्सॉनकडून आले आहे. त्याने अलीकडेच अपग्रेडेड इलेक्ट्रिक सिडान कार लॉन्च केली आहे. राज्य आणि केंद्र सरकार ग्रीन टेक्नॉलॉजीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि वेहिकल चार्जिंग नेटवर्क उभे करण्याची दाट शक्यता आहे.
Web Title: Tata Motors To Invest 15000 Crores In Electric Vehicle Plan
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..