टाटा मोटर्सचे वाहनकर्जासाठी बँक ऑफ इंडियाशी टायअप

Tata Motors
Tata Motors sakal media
Updated on

मुंबई : लोकांना आपल्या मनातली कार घेता यावी म्हणून टाटा मोटर्सने (tata motors) बँक ऑफ इंडियाशी (bank of India) टायअप (tie up) करून 6.85 टक्के एवढ्या कमी दरापासून वाहनकर्ज (car loan) उपलब्ध केले आहे. बँक ऑफ इंडिया टाटा मोटर्सच्या गाड्यांसाठी हे वाहनकर्ज उपलब्ध करून देईल. यात गाडीची एक्स शोरुम किंमत (car ex showroom price), गाडीचा विमा (car insurance), रजिस्ट्रेशन चार्जेस (registration charges) आदी मिळून होणाऱ्या किमतीच्या 90 टक्के कर्ज दिले जाईल.

Tata Motors
शरद पवारांनाही समजूंदे त्यांच्या मंत्र्याने काय रंग उधळले - देवेंद्र फडणवीस

सात वर्षांसाठी वाहनकर्ज घेतल्यास त्याचा इएमआय प्रति एक लाख रुपये कर्जामागे किमान 1,502 रु. एवढा राहील. या कर्जासाठी 31 मार्च 2022 पर्यंत प्रोसेसिंग फी देखील आकारली जाणार नाही. हे कर्ज परंपरागत इंधनावर चालणाऱ्या मोटारी किंवा इलेक्ट्रिक मोटारींसाठी मिळेल. सणासुदीच्या निमित्ताने मोटार घेण्याचे लोकांचे स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून ही योजना आणल्याचे टाटा मोटर्सचे उपाध्यक्ष (विक्री) राजन अंबा म्हणाले.

या योजनेमुळे प्रवाशांना दर्जेदार वाहन व अत्यंत रास्त दरात वाहनकर्ज असा दुहेरी फायदा होईल, असे बँकेचे सरव्यवस्थापक (रिटेल बिझनेस) राजेश इंगळे म्हणाले. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी टाटा मोटर्सच्या विक्रेत्याकडे किंवा बँक ऑफ इंडियाच्या शाखेत संपर्क साधावा, अधिक माहितीसाठी https://cars.tatamotors.com/

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com