Tega Industriesचा आणखी एक IPO; जाणून घ्या एका शेअरची किंमत

तेगा इंडस्ट्रीज लिमिटेडचा (Tega Industries) आयपीओ 1 डिसेंबरला येणार आहे. या इश्यूद्वारे 619.22 कोटी रुपये उभारण्याची योजना कंपनीने आखली आहे.
Tega Industries IPO
Tega Industries IPOesakal
Summary

तेगा इंडस्ट्रीज लिमिटेडचा (Tega Industries) आयपीओ 1 डिसेंबरला येणार आहे. या इश्यूद्वारे 619.22 कोटी रुपये उभारण्याची योजना कंपनीने आखली आहे.

Tega Industries IPO : खनिज आणि खाण उद्योगात सेवा पुरवणारी कंपनी तेगा इंडस्ट्रीज लिमिटेडचा (Tega Industries) आयपीओ (IPO) 1 डिसेंबरला अर्थात येत्या 4-5 दिवसात येणार आहे आणि तो 3 डिसेंबरपर्यंत खुला असेल. तेगा इंडस्ट्रीजने आयपीओसाठी 443 ते 453 रुपये प्रति शेअर प्राईस बँड ठेवला आहे. कंपनी या आयपीओतून 619.22 कोटी रुपये उभारणार आहे. हा आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेलवर (OFS) आधारित असेल. तुम्हीही त्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

काही माहिती आयपीओबाबत...

तेगा इंडस्ट्रीजचा आयपीओ पूर्णपणे विक्रीसाठी ऑफर (OFS) असेल. आयपीओ अंतर्गत, 1,36,69,478 इक्विटी शेअर्सची विक्री केली जाणार आहे. प्रमोटर मदन मोहन मोहंका त्यांचे 33.14 लाख इक्विटी शेअर्स आणि मनीष मोहंका 6.63 लाख इक्विटी शेअर्स विकणार आहेत. दुसरीकडे, यूएस-आधारित खासगी इक्विटी फर्म TA असोसिएट्स वॅगनर ऑफर फॉर सेलद्वारे 96.92 लाख शेअर्स विकणार आहेत. सध्या तेगा इंडस्ट्रीजमध्ये प्रमोटर्स आणि प्रमोटर ग्रुपकडे 85.17 टक्के हिस्सा आहे. तर वॅगनरची 14.54 टक्के भागीदारी आहे.

Tega Industries IPO
100 रुपयांपेक्षा स्वस्त शेअर! येणाऱ्या काळात मजबूत परतावा देणार

प्राइस बँड आणि लॉट साइज

तेगा इंडस्ट्रीजने आयपीओसाठी 443 ते 453 रुपये प्रति शेअर प्राईस बँड निश्चित केला आहे. त्याच वेळी, यात 33 शेअर्सची लॉट साईज असेल. गुंतवणूकदारांना कमीत कमी एका लॉट साइजसाठी बोली लावावी लागेल. 453 रुपयांनी विचार केल्यास किमान 14,949 रुपये एका लॉटसाठी लागतील. तुम्ही जास्तीत जास्त 13 लॉटसाठी बोली लावू शकता. म्हणजेच किरकोळ गुंतवणूकदार जास्तीत जास्त 1,94,337 रुपये गुंतवू शकतात.

Tega Industries IPO
VLCC IPO: लवकरच येणार व्हिएलसीसीचा आयपीओ

कंपनी नेमके काय करते ?

तेगा इंडस्ट्रीज जागतिक खनिज कंपन्यांना स्क्रीनिंग, खाणकाम आणि साहित्य हाताळणीसारख्या (Material Handling) सेवा पुरवते. महसुलाच्या आधारावर, तेगा इंडस्ट्रीज ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची पॉलिमर आधारित मिल लायनर उत्पादक आहे. तेगा इंडस्ट्रीजने 1978 मध्ये स्वीडिश कंपनी स्काजा एबीच्या (Skaja AB) सोबतीने व्यवसाय सुरू केला. त्यानंतर प्रमोटर मदन मोहन मोहनांनी 2001 मध्ये कंपनीतील स्काजा एबीचे (Skaja AB) सगळे स्टेक विकत घेतले. कोलकाता-आधारित कंपनी आपल्या उत्पादन पोर्टफोलिओद्वारे खनिज फायदे (Mineral Beneficiation), खाणकाम (Mining) आणि मोठ्या प्रमाणात घन पदार्थ हाताळणाऱ्या उद्योगांमध्ये (Solid Handling Industry) जागतिक ग्राहकांना सर्वसमावेशक उपाय (Comprehensive Solutions) देते.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com