टेलिकॉममधील ६० हजार रोजगारांवर टांगती तलवार

वृत्तसंस्था
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

नवी दिल्ली - नव्या तंत्रज्ञानाचा शिरकाव आणि दिवसागणिक वाढणाऱ्या गळेकापू स्पर्धेने दूरसंपर्क सेवा पुरवठादारांना (टेलिकॉम) काटकसरीचा मार्ग पत्करावा लागला आहे. बाजारात तग धरू राहण्यासाठी विलीनीकरण आणि कर्मचारी कपातीसारख्या निर्णय नजिकच्या काळात कंपन्यांना घ्यावे लागणार असून, दूरसंपर्क क्षेत्रातील जवळपास ६० हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्‍यता आहे. 

दूरसंपर्क क्षेत्रात ‘रिलायन्स जिओ‘ने पाऊल ठेवल्यापासून या उद्योगातील स्पर्धा तीव्र झाली आहे. बहुतांश कंपन्यांचा तोटा वाढला असून, ३० सप्टेंबरअखेर या क्षेत्रातील १५ ते २० हजार कर्मचाऱ्यांनी नोकऱ्या गमावल्याचे जाणकारांनी सांगितले. ग्राहकसेवा केंद्र, पायाभूत सेवा आदी विभागांमधील ७ ते ८ हजार कर्मचाऱ्यांना नारळ मिळणार आहे. मार्च २०१९ अखेर जवळपास ६० ते ७५ हजार नोकऱ्यांवर गंडांतर येईल, असे टीमलीझ या मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या कंपनीने म्हटले आहे.

Web Title: Telecom 60000 employment Issue