क्रिप्टो जगतातील आतापर्यंतची सर्वात मोठी चोरी, कंपनीकडून हॅकर्सना खुलं पत्र

क्रिप्टो जगतातील आतापर्यंतची सर्वात मोठी चोरी, कंपनीकडून हॅकर्सना खुलं पत्र

नव्या युगाचे चलन म्हणजे सध्या क्रिप्टो करन्सीकडे पाहिलं जातं. आपल्याला विविध क्रिप्टो बद्दल माहिती देखील आहे. ज्यामध्ये बिटकॉइन, इथेरियम, सुप्रसिद्ध डोज कॉईन, बिटकॉइन लाईट, इथेरियम लाईट अश्या एक ना अनेक क्रिप्टो करन्सीचा यामध्ये समावेश आहे. मात्र अगदी काही निवडक व्यक्तींनाच १०० टक्के हे क्रिप्टो कसं काम करतं, त्याचं मायनिंग कसं करतात, याबद्दल माहिती आहे. अर्थात कमी काळात जास्त पैसे कमावण्याच्या नादात अनेक लोकं क्रिप्टोमध्ये माहिती न घेता पैसे गुंतवतात आणि पैसे गमावतात देखील.

अशीच एक मोठी घटना नुकतीच घडलीये ज्यामुळे क्रिप्टो गुंतवणूकदारांनी आपले पैसे गमावल्याचं पाहायला मिळतंय. ही गोष्ट म्हणजे आतापर्यंतची सर्वात मोठी क्रिप्टो चोरी असल्याचं समजतंय. काही हॅकर्सनी पॉली नेटवर्कमधून तब्बल $ 611 दशलक्ष चोरले आहेत. या चोरीचा फटका सर्वात जास्त इथेरियम क्रिप्टो करन्सी विकत घेतलेल्यांना बसलेला पाहायला मिळतोय. कारण या चोरीत हॅक केलेल्या मालमत्तेमध्ये इथेरियम टोकनचे $ 273 दशलक्ष, बिनेन्स स्मार्ट चेनवरील $ 253 दशलक्ष आणि पॉलीगॉन नेटवर्कवरील यूएसडीसी मध्ये $ 85 दशलक्ष आहेत.

क्रिप्टो जगतातील आतापर्यंतची सर्वात मोठी चोरी, कंपनीकडून हॅकर्सना खुलं पत्र
सलमानने घेतली मीराबाई चानूची भेट; गळ्यातील स्कार्फमुळे झाला ट्रोल

या सायबर हल्ल्याला पॉली नेटवर्कवर झालेला आतापर्यंतचा सर्वात मोठा सायबर हल्ला मानला जातोय. याबाबत स्वतः पॉली नेटवर्कच्या अधिकृत ट्विटरवरून ट्विट करत याबाबत माहिती देण्यात आली. ज्यात पॉली नेटवर्क कडून सांगण्यात आले आहे की, हल्ल्यामुळे बिनान्स चेन, पॉलीगॉन आणि इथेरियम वॉर हल्ला झालेला आहे. पॉली नेटवर्क हे एक डी सेंट्रलाइज्ड फायनान्स (DeFi) म्हणजे विकेंद्रित वित्तीय प्लॅटफॉर्म आहे. दरम्यान या हल्ल्यानंतर पॉली नेटवर्क कडून हॅकर्स ना एक खुलं पत्र लिहिण्यात आलं आहे, ज्यामध्ये हाक केलेली मालमत्ता परत करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे.

करण्यात आलेल्या चोरीत एथेरियम क्रिप्टो सर्वाधिक असल्याचं समजतंय. हॅक केलेल्या मालमत्तेमध्ये इथरियम टोकनचे $ 273 दशलक्ष, बिनेन्स स्मार्ट चेनवरील $ 253 दशलक्ष आणि पॉलीगॉन नेटवर्कवरील यूएसडीसीमध्ये $ 85 दशलक्ष यांचा समावेश आहे.

टीम पॉली नेटवर्क करून लिहिलं गेलं खुलं पत्र :

आम्ही तुमच्याशी संवाद साधू इच्छितो आणि आम्ही तुम्हाला हॅक केलेली मालमत्ता परत करण्याचा आग्रह करतो. तुमच्याकडून चोरी करण्यात आलेली मालमत्ता ही DiFi च्या इतिहासातील सर्वाधिक मालमत्ता आहे. देशातील कायद्यांनुसार हा एक अत्यंत मोठा गुन्हा असून याचा पाठपुरावा केला जाईल. यापुढे तुम्ही अशा प्रकारचे व्यवहार करणं उचित राहणार नाही. तुमच्याकडून चोरण्यात आलेले पैसे हे अनेक क्रिप्टो मेंबर्स आणि अर्थात जनतेचे आहेत. याबाबद्दल आमच्याशी बोलून याबाबत पर्याय काढण्यात यावा.

दरम्यान, महत्त्वाची बाब म्हणजे पॉली नेटवर्कच्या आवाहनानंतर हॅकर्सनी आता काही टोकण परत करण्यास सुरवात केली आहे.

दरम्यान पॉली नेटवर्ककडून झालेल्या हॅकिंगबाबत प्राथमिक तपासणी करून असुरक्षिततेचे कारण शोधलं जात आहे. कंपनीच्या मते हॅकर्सनी कॉन्ट्रॅक्ट कॉल दरम्यान असुरक्षिततेचा गैरफायदा घेतला असल्याचं सांगितलं जातंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com