
करदात्यांना पुन्हा दिलासा? ITR दाखल करण्याची अंतिम मुदत वाढू शकते
जर सर्व काही ठीक असेल, तर पुन्हा एकदा इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax Return - ITR) भरण्याची अंतिम मुदत वाढवली जाऊ शकते. खरेतर, आर्थिक वर्ष 2019-20 च्या तुलनेत या वर्षी आयकर रिटर्न भरणाऱ्या करदात्यांची संख्या कमी आहे. 15 डिसेंबर 2021 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, 2020-21 या आर्थिक वर्षासाठी 3.59 कोटी पेक्षा जास्त ITR दाखल करण्यात आले आहेत. सरकारी आकडेवारीनुसार, दररोज 6 लाखांहून अधिक ITR दाखल केले जात आहेत आणि हे वाढत देखील आहे. 2019-20 या आर्थिक वर्षासाठी 5.95 कोटींपेक्षा जास्त ITR दाखल करण्यात आले होते. मात्र, 2019-20 या आर्थिक वर्षासाठी 12 जानेवारीपर्यंत संधी होती. (The deadline for filing income tax returns may be extended)
तथापि, गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यावेळी 2.36 कोटी ITR दाखल करणे बाकी आहे आणि 31 डिसेंबर 2021 ही अंतिम मुदत संपण्यासाठी 13 दिवस शिल्लक आहेत. यामुळेच आयटीआर दाखल करण्याची मुदत वाढवणे अपेक्षित आहे. 2020-21 या आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2021 आहे. आधीच ही मुदत दोनदा म्हणजे 31 जुलै व त्यानंतर 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली होती.
यावेळी उशीर होण्याचे कारण म्हणजे 2020-21 या आर्थिक वर्षासाठी आयकर रिटर्न भरण्यासाठी एक नवीन पोर्टल सुरू करण्यात आले. देशातील आघाडीची आयटी कंपनी इन्फोसिसने (Infosys) हे पोर्टल तयार केले आहे. मात्र, पोर्टलमधील अडचणींमुळे अनेक दिवस आयटीआर फाइलिंगमध्ये अडथळे येत होते.