आयकर विभाग
आयकर विभागSakal

आयकर विभागाने वाढवली ITR पडताळणीसाठी फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदत

आयकर विभागाने वाढवली ITR पडताळणीसाठी फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदत
Summary

आयकर भरणारे आयटीआरची एक प्रत बंगळूरमधील CPC कार्यालयात पाठवून देखील सत्यापित करू शकतात.

कायद्यानुसार, डिजिटल स्वाक्षरीशिवाय इलेक्‍ट्रॉनिक पद्धतीने इन्कम टॅक्‍स रिटर्न (Income Tax Return - ITR) भरण्यासाठी आधार OTP, नेटबॅंकिंग (Net Banking), डिमॅट खात्याद्वारे पाठवलेला कोड, पूर्व-प्रमाणित बॅंक खाते किंवा ATM द्वारे पडताळणी करणे आवश्‍यक आहे. ज्या करदात्यांनी अद्याप त्यांचे आर्थिक वर्ष 2019-20 चे (Financial Year 2019-20) प्राप्तिकर परतावे ई-सत्यापित (पडताळणी) (Verification) केलेले नाहीत ते 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत सत्यापन प्रक्रिया पूर्ण करू शकतात. आयकर विभागाने (Income Tax Department) करदात्यांना दिलासा देत पडताळणीची मुदत वाढवली आहे. (The deadline for ITR verification issued by the Income Tax Department has been extended to February 2022)

आयकर विभाग
नवीन वर्षात बदलताहेत 'हे' तीन नियम! दुर्लक्ष कराल तर पडेल महागात

ही पडताळणी प्राप्तिकर रिटर्न भरल्यानंतर 120 दिवसांच्या आत करणे आवश्‍यक आहे. याशिवाय, आयकर भरणारे आयटीआरची एक प्रत बंगळूरमधील (Bengaluru) सेंट्रलाइज्ड प्रोसेसिंग सेंटर (Centralized Processing Center - CPC) कार्यालयात पाठवून देखील सत्यापित करू शकतात. जर पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाली नाही, तर रिटर्न भरले गेले नाही, असे मानले जाते.

आयकर विभाग
'हे' पाच व्यवहार रोखीने केल्यास घरपोच येईल टॅक्‍स नोटीस!

आतापर्यंत दाखल झाले 4,86,34,306 ITR

मूल्यांकन वर्ष 2020-21 साठी 28 डिसेंबर 2021 पर्यंत एकूण 4,86,34,306 ITR दाखल करण्यात आले आहेत, त्यापैकी 18,89,057 ITR एकाच दिवशी दाखल करण्यात आले आहेत. प्राप्तिकर विभागाने बुधवारी सांगितले की, 28 डिसेंबरपर्यंत 4.86 कोटीहून अधिक आयकर रिटर्न भरले गेले आहेत, त्यापैकी सुमारे 19 लाख रिटर्न एकट्या 28 डिसेंबरला भरले गेले आहेत. वैयक्तिक करदात्यांसाठी आर्थिक वर्ष 2020-21 साठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2021 आहे. आयकर विभागाने ट्विट केले की 2.50 कोटी पेक्षा जास्त ITR-1 आणि 1.23 कोटी ITR-4 यात सामील आहेत. ITR-1 (सहज) आणि ITR-4 (सुगम) हे रिटर्न फॉर्मचे सोपे प्रकार आहेत, जे मोठ्या संख्येने लहान आणि मध्यम करदात्यांनी वापरले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com