RBI ची मोठी कारवाई! तीन बॅंकांना 30 लाखांहून अधिक रुपयांचा दंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

RBI
RBI ची मोठी कारवाई! तीन बॅंकांना 30 लाखांहून अधिक रुपयांचा दंड

RBI ची मोठी कारवाई! तीन बॅंकांना 30 लाखांहून अधिक रुपयांचा दंड

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India - RBI), कर्जाच्या बाबतीत वैधानिक आणि इतर निर्बंधांबाबत जारी केलेल्या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल तीन बॅंकांना दंड ठोठावला आहे. हा दंड 30 लाख रुपयांपेक्षाही जास्त आहे. या तीन बॅंका आहेत MUFG बॅंक, चिपळूण अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंक लि. आणि दत्तात्रेय महाराज कळंबे जाओली सहकारी बॅंक लि. (The RBI has imposed fines of over Rs 30 lakh on three banks)

हेही वाचा: ITR दाखल करण्यासाठी पासवर्ड नाही! नो प्रॉब्लेम; तरीही भरू शकता रिटर्न

कर्जाच्या बाबतीत वैधानिक आणि इतर निर्बंधांबाबत जारी केलेल्या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल MUFG बॅंक लिमिटेडला 30 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. MUFG बॅंक पूर्वी The Bank of Tokyo-Mitsubishi UFJ Ltd म्हणून ओळखली जात होती. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने म्हटले आहे की, 31 मार्च 2019 रोजी MUFG बॅंकेच्या आर्थिक स्थितीच्या संदर्भात पर्यवेक्षी मूल्यांकनादरम्यान, इतर गोष्टींबरोबरच कंपन्यांना कर्ज आणि आगाऊ रक्कम मंजूर करण्याबाबत बॅंकेने जारी केलेल्या निर्देशांचे पालन न केल्याची माहिती मिळाली. या अंतर्गत बॅंकेने अशा कंपन्यांना कर्ज दिले ज्यांच्या संचालक मंडळात इतर बॅंकांच्या संचालक मंडळातील व्यक्तींचा समावेश होता.

हेही वाचा: फक्त आठ दिवस बाकी! त्वरित उरका EPF, ITR सह ही चार महत्त्वाची कामे

आणखी एका निवेदनात आरबीआयने कळवले की, चिपळूण अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंक लि., रत्नागिरीला काही प्रकरणांमध्ये कर्ज मर्यादा न पाळल्याबद्दल 2 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय दत्तात्रेय महाराज कळंबे जाओली सहकारी बॅंक लि., मुंबई या बॅंकेलाही अशाच एका प्रकरणात एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

Web Title: The Rbi Has Imposed Fines Of Over Rs 30 Lakh On Three Banks

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top