Share Market बॅक ऑन ट्रॅक! आज कोणत्या 10 शेअर्सवर लक्ष ठेवाल?

बाजाराची दिशा स्पष्ट होण्यापूर्वी आणखी काही आठवडे बाजारात कंसोलिडेशन दिसेल.
Share Market
Share MarketSakal
Summary

बाजाराची दिशा स्पष्ट होण्यापूर्वी आणखी काही आठवडे बाजारात कंसोलिडेशन दिसेल.

शेअर बाजारातील (Share Market) मोठ्या पडझडीनंतर बुधवारी तेजीचा सलग दुसरा दिवस होता. दोन्ही सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty) 1 टक्‍क्‍यांहून अधिक वाढून बंद झाले. छोट्या आणि मध्यम शेअर्समध्येही मोठी खरेदी झाली. आज विकली एक्स्पायरी (Weekly expiry)आहे. रियल्टी, फार्मा, मेटल शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली. ऑटो, आयटी शेअर्सही वधारले. मिडकॅप (Midcap), स्मॉलकॅप शेअर्समध्येही (Smallcap shares) खरेदी झाली.

Share Market
Share MarketSakal

सेन्सेक्स 612 अंकांनी वाढून 56,931 वर बंद झाला. निफ्टी 185 अंकांनी वाढून 16,955 वर बंद झाला. निफ्टी बँक 422 अंकांनी वाढून 35,029 वर बंद झाला. मिडकॅप 451 अंकांनी वाढून 29,659 वर बंद झाला. बुधवारी सेन्सेक्समधील 30 पैकी 26 शेअर्सची खरेदी झाली. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 42 शेअर्स तेजीत होते. निफ्टी बँकेच्या 12 पैकी 11 शेअर्समध्ये वाढ झाली. बुधवारी डॉलरच्या तुलनेत रुपया 5 पैशांनी मजबूत होऊन 75.55 वर बंद झाला.

आज बाजाराची स्थिती कशी असेल ?

निफ्टीने डेली स्केलवर बुलिश कँडल तयारी केल्याचे मोतीलाल ओसवालचे चंदन तापडिया म्हणाले. याचा सोपा अर्थ तेजी असा आहे. आता जर 17,200 -17,350 च्या दिशेने जायचे असेल तर ते 17,000 च्या वर रहावे लागेल. डाउनसाइडवर, 16,800 -16,600 च्या झोनमध्ये सपोर्ट असल्याचेही ते म्हणाले. गेल्या दोन्ही व्यापारी दिवसांतील अस्थिरता थोडी कमी होत आहे. बाजारातील स्थिरतेसाठी, इंडिया विक्सचा 15-14 झोनमध्ये प्रवेश करणे महत्त्वाचे आहे असेही तापडिया म्हणाले.

Share Market
Share Marketsakal

निफ्टीमध्ये येत्या काळात सकारात्मक कल दिसण्याची चिन्हे असल्याचे कोटक सिक्युरिटीजचे सहज अग्रवाल म्हणाले. यासाठी 17400-17500 वर रेझिस्टन्स दिसू शकतो. बाजाराची दिशा स्पष्ट होण्यापूर्वी आणखी काही आठवडे बाजारात कंसोलिडेशन दिसेल. यावेळी, बाजारातील मिड कॅपऐवजी फ्रंटलाइन स्टॉकवर लक्ष केंद्रित करावा असा सल्ला त्यांनी दिला.

आज कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल ?

- हिन्दाल्को (HINDALCO )

- टाटा मोटर्स (TATAMOTORS)

- डिविज लॅबोरेटोरी (DIVISLAB)

- आयशर मोटर्स (EICHERMOT)

- बजाज फायनान्स (BAJFINANCE)

- एसआरएफ लिमिटेट (SRF)

- मणप्पुरम (MANAPPURAM)

- आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)

- अपोलो टायर्स (APOLLOTYRE)

- एल अँड टी फायनान्स होल्डिंग्स (L&TFH)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com