...तेव्हा रुपया ५० रुपयांच्या आसपास होता; थरुरांचा PM मोदींवर हल्लाबोल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shashi Tharoor
...तेव्हा रुपया ५० रुपयांच्या आसपास होता; थरुरांचा PM मोदींवर हल्लाबोल

...तेव्हा रुपया ५० रुपयांच्या आसपास होता; थरुरांचा PM मोदींवर हल्लाबोल

नवी दिल्ली : डॉलरच्या तुलनेत रुपयाचं अवमुल्यन होऊत तो ८० वर गेल्यानं काँग्रेस नेते आणि खासदार शशी थरुर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मोदी जेव्हा सत्तेत आले तेव्हा रुपया ५० रुपयांवर होता आता तो ८० रुपयांवर पोहोचला आहे, अशा शब्दांत त्यांनी सडकून टीका केली. (then rupee value was around 50 rupees Shashi Tharoor attack PM Modi)

थरुर म्हणाले, मोदी सत्तेत आले तेव्हा रुपया ५० रुपयांवर होता आता तो ८० रुपयांवर पोहोचला आहे. आता जबाबदारीचा प्रश्न कुठे आहे? तुम्हाला आता प्रत्येक आयातीच्या वस्तूसाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत कारण रुपयाची किंमत घसरली आहे. तसेच इंधनाच्या किंमती वाढल्या आहेत, महागाई वाढत आहे त्याचबरोबर आता जीएसटीचं अतिरिक्त ओझं सर्वसामान्य माणसावर पडलं आहे.

हेही वाचा: ''शरद पवारांसाठी २००९ मध्येच मविआ युती निश्चित झाली होती''

रुपया 80 च्या पुढे गेला आहे. मोदीजींनी हा मुद्दा सन 2014 च्या निवडणुकीचा मुद्दा बनवला. ते सत्तेत आले तेव्हा रुपया मजबूत करणार होते कारण आधीचं सरकार कमकुवत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. मग आत्ताची परिस्थिती काय आहे? ते आपल्याला मजबूत सरकार देत आहेत का? असा सवालही थरुर यांनी विचारला आहे.

हेही वाचा: आयुष्याची संध्याकाळ अंधारमय, रामदास कदम ढसाढसा रडले

दरम्यान, भारतीय चलन असलेल्या रुपयाचं आज डॉलरच्या तुलनेत पहिल्यांदाच ऐतिहासिक अवमुल्यन झालं. आज (१९ जुलै २०२२) रुपया डॉलरच्या तुलनेत ८०.०५ रुपयांवर पोहोचला. गेल्याकाही दिवसांपासून रुपयाच्या मुल्यात सातत्यानं पडझड सुरु आहे. रुपयाचं मुल्य घसरल्यानं आपल्याला आयात कराव्या लागणाऱ्या गोष्टी जास्त पैसे देऊन खरेदी कराव्या लागतात.

Web Title: Then Rupee Value Was Around 50 Rupees Shashi Tharoor Attack Pm Modi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..