ऑईल अँड गॅस सेक्टरमधील 'हे' 3 शेअर्स देतील भरघोस परतावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shares
ऑईल अँड गॅस सेक्टरमधील 'हे' 3 शेअर्स देतील भरघोस परतावा

ऑईल अँड गॅस सेक्टरमधील 'हे' 3 शेअर्स देतील भरघोस परतावा

आगामी काळात एलएनजीचा पुरवठा वाढणार आहे, त्याचा फायदा या सेक्टरला मिळेल, असे मोतीलाल ओसवाल यांच्या अहवालात म्हटले आहे. वाजवी गॅसच्या किमती भारतीय गॅस सेक्टरला चालना देतील. गेल, गुजरात गॅस, गुजरात स्टेट पेट्रोनेट देशांतर्गत बाजारात अत्यंत चढे राहतील..ऑईल अँड गॅस सेक्टरमध्ये गेल्या एका वर्षापासून बरीच उलथापालथ सुरू आहे. त्याचा परिणाम या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सवरही दिसून येत आहे. स्पॉट मार्केटमध्ये एलएनजीच्या किमती वाढल्याने गेल, गुजरात गॅस, गुजरात स्टेट पेट्रोनेट या कंपन्यांना फायदा झाला आहे. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालच्या अहवालानुसार येत्या काही दिवसांत एलएनजीचा पुरवठा वाढणार आहे.वाजवी गॅसच्या किमती मध्यम मुदतीत भारतीय गॅस क्षेत्राला चालना देतील. अशा परिस्थितीत गेल, गुजरात गॅस, गुजरात स्टेट पेट्रोनेट येत्या काळात देशांतर्गत बाजारात अव्वल ठरतील. जर या कंपन्यांचे शेअर्स पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट केले गेला तर पुढे जाऊन मजबूत परतावा मिळण्याची अपेक्षा आहे.

1. गेल (इंडिया) लिमिटेड (GAIL): 42% पर्यंत अपेक्षित परतावा
मोतीलाल ओसवाल यांनी GAIL India वर 200 रुपयांच्या टारगेटसह 'बाय' रेटिंग कायम ठेवले आहे. 18 नोव्हेंबर 2021 रोजी शेअरची सध्याची किंमत 141 रुपये होती. इथून पुढे या स्टॉकमध्ये सुमारे ४२ टक्के परतावा मिळू शकतो. गेल्या वर्षभरात स्टॉकचा परतावा 50 टक्के झाला आहे. 2022 च्या तिसऱ्या तिमाहीत ( 3QFY22 ) पेट्रोकेम मार्जिन वाढेल. त्यामुळे, लार्जकॅप स्पेसमध्ये गेल ही सर्वोच्च निवड असल्याचे मोतीलाल ओसवालच्या अहवालात म्हटले आहे .
2. गुजरात स्टेट पेट्रोनेट (GUJS) : 46% परतावा अपेक्षित आहे.
ब्रोकरेज मोतीलाल ओसवाल यांनी गुजरात स्टेट पेट्रोनेटला (GUJS) 450 रुपयांच्या टारगेटसह बाय रेटिंग दिले आहे. 18 नोव्हेंबर 2021 रोजी या शेअरची सध्याची किंमत 307 रुपये होती. इथून पुढे या स्टॉकला सुमारे ४६ टक्के परतावा मिळू शकतो. गेल्या एक वर्षाचा परतावा 63 टक्के आहे.

3. गुजरात गॅस (GUJRAT GAS ): 22 % परतावा अपेक्षित
ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी गुजरात गॅसचे (GUJGAS) शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. याचे टारगेट 775 रुपये निश्चित जर केले आहे. 18 नोव्हेंबर 2021 रोजी या शेअरची किंमत 637 रुपये होती. इथून पुढे या स्टॉकमध्ये सुमारे 21.66 टक्के परतावा मिळू शकतो. गेल्या एक वर्षाचा परतावा 96 टक्के आहे.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

loading image
go to top