Home Loan : तुमच्या सणांच्या खर्चाचे व्यवस्थापन करा - तुमचे गृहकर्ज कमी करण्याचे मार्ग

दिवाळी संपल्यानंतर दिवशी तुमचा बँक बॅलन्स तुम्हाला गंभीर अडचणीत तर आणणार नाही याची खात्री करा
Home Loan
Home Loansakal

| मुख्य विपणन अधिकारी | होमफर्स्ट फायनान्स कंपनी नवरात्र संपल्यानंतर आता सभोवताली सुगंधी फुलांचा दरवळ आणि सोबतच तोंडाला पाणी सुटणाऱ्या गोडधोड पदार्थांचा सुगंध आता या दिवसात अनुभवायला येऊ लागला आहे. याचा अर्थ एकच की आता सणांचा हंगाम अगदी जवळ आला आहे. सणासुदीचा कल हा एकप्रकारे संधींचा हंगामही असतो. तुमची स्वतःची कार, बाईक, एसी आणि अगदी तुमचे स्वतःचे घर घेण्याची ही योग्य वेळ असते. सणासुदीतील खरेदीवरच्या ऑफर आणि सवलती अर्थातच तुमचे लक्ष वेधून घेत असतात. हो पण दिवाळी संपल्यानंतर दिवशी तुमचा बँक बॅलन्स तुम्हाला गंभीर अडचणीत तर आणणार नाही याची खात्री करा.

या काही टिपा आहेत त्या लक्षात घेऊन त्याची खात्री करून घ्या.. सर्वात पहिला नियम म्हणजे कोणत्याही मोठया सणाच्या आधी आपल्या खर्चाची योजना करा. त्यामुळे तुमचे बजेट वाढणार (मोठया प्रमाणावर) नाही याची निश्चिती मिळते आणि दिवाळी साजरी करताना त्यावर नियंत्रण ठेऊ शकता. याचा अर्थ असा नाही की तुम्ही यंदाची दिवाळी अजिबात साजरी करू नये, फक्त तुम्ही कोणत्याही नियोजित खरेदीचा, नियमित खर्चाचा आणि मासिक ईएमआयचा अंदाज लावला पाहिजे. मग तुम्ही तणावमुक्त दिवाळी साजरा करू शकता.

दुसरी गोष्ट म्हणजे, जर तुम्ही अलीकडे स्वतःचे घर घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही सणासुदीपर्यंत थांबावे असे मी तुम्हाला सुचवेन. नवीन सुरुवात करण्यासाठी एक शुभ काळ असतोच पण सणासुदीचा काळ हा देखील स्वतःचे घर खरेदी करण्याचा एक प्रमुख काळ असतो. सणासुदीच्या हंगामात जवळपास सर्वच बांधकाम उद्योगातील बांधकाम व्यावसायिक आणि कर्ज देणाऱ्या संस्था/ बँका नवीन घरांच्या खरेदीवर प्रोत्साहन देतात. इतकेच नाही तर गृह कर्जावरील प्रक्रिया शुल्कावर सवलत, कमी व्याजदर, शून्य मुद्रांक शुल्क, घराचे आगाऊ बुकिंग केल्यास भेट म्हणून सोन्याचे नाणे आधी विविध सवलती व सुविधा तुमच्या सुरुवातीच्या घर खरेदी खर्चात लक्षणीय फरक पाडू शकतात.

समजा तुमच्या स्वप्नातील घराची किंमत २० लाख रुपये आहे आणि तुमच्या खिशातून ५ लाख रुपये डाऊन पेमेंट म्हणून देण्याची आणि उर्वरित १५ लाखांसाठी कर्ज घेण्याची योजना तुम्ही आखत आहात. सणासुदीच्या काळात, तुमचा बिल्डर प्रति चौरस फूट दरावर काही सवलत देऊ शकतो ज्यामुळे तुम्हाला १८ लाख रुपयांच्या सुधारित किंमतीचा फायदा मिळू शकतो. त्यामुळे आता तुम्ही एकतर कमी डाउनपेमेंट भरू शकता किंवा आम्ही शिफारस केल्याप्रमाणे समान डाउनपेमेंट भरू शकता आणि त्याऐवजी १३ लाख रुपयांचे कर्ज घेऊ शकता. सुरुवातीला लहान कर्ज घेणे हा तुमचे कर्ज कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. शेवटचे पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जर तुम्ही आधीच गृहकर्ज घेतले असेल तर तुमच्या दिवाळी बोनसचा चांगला उपयोग करून घ्या.

तुम्ही ही म्हण ऐकली असेल की वेळेत मारलेला एक टका तुमचे नऊ टाके वाचवतो, तसेच कर्जाची वेळेत पूर्वपरतफेड ही व्याज रकमेची लाखोंची बचत करू शकते. पूर्वपरतफेड हा बहुतेक कर्ज देणाऱ्या बँका / संस्था यांनी दिलेला एक पर्याय आहे ज्याद्वारे कर्जदार त्यांच्या ईएमआय पेक्षा जास्त विशिष्ट रक्कम देऊ शकतात.! ही रक्कम कर्ज घेतलेल्या मूळ रकमेतून पूर्णपणे वजा केली जाते. कर्ज देणाऱ्या बँका / संस्था कर्जाच्या कालावधीत या भरलेल्या रकमेवर कोणतेही व्याज देत नसल्यामुळे, ते व्याज वाचवतात.

अन्यथा हे व्याज भविष्यात त्यावर देय असते. तुम्ही एकतर एकरकमी रक्कम भरणे किंवा ठराविक कालावधीत लहान पूर्वपरतफेड करणे यापैकी निवडू शकता. अशा प्रकारे तुमचा एक-वेळचा बोनस भविष्यात त्याच्या मूल्यापेक्षा खूप जास्त फळ देऊ शकतो. मग वाट कसली बघता...चटकन बजेट आखा. आणीबाणीसाठी काही रक्कम बाजूला ठेवा जेणेकरून तुमच्याकडे एक निश्चित रक्कम असेल जी तुम्ही सण, उत्सवावर खर्च करू शकाल. तुमच्या दिवाळी बोनसचा चांगला वापर करा आणि मी हमी देतो की ही दिवाळी केवळ तणावमुक्तच नाही तर या सणाच्या हंगामाचा आनंद तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी वर्षभर गुंजत राहील यात शंका नाही..

लेखक: गौरव मोहता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com