हा FMCG स्टॉक 3 महिन्यांत देईल मजबूत परतावा...

बाजारात जो ट्रेंड सुरु आहे त्यात एफएमसीजी क्षेत्रातील कंपन्यांना आणि त्यांच्या शेअर्सना फायदा होईल असा अंदाज आहे.
shares
sharesgoogle
Updated on

मुंबई : शेअर बाजारात सध्या सुरू असलेल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर आणि सणासुदीच्या माहौलमध्ये तुम्हालाही कमाई करायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुम्हाला या काळात चांगला रिटर्न देणाऱ्या शेअरबाबत सांगणार आहोत.

बाजारात जो ट्रेंड सुरु आहे त्यात एफएमसीजी क्षेत्रातील कंपन्यांना आणि त्यांच्या शेअर्सना फायदा होईल असा अंदाज आहे. मिडकॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये निफ्टीमध्ये नुकत्याच झालेल्या कंसॉलिडेशनमध्ये सुधारणा दिसून येत असल्याचे इक्विटी रिसर्च फर्म आयसीआयसीआय डायरेक्टने एका अहवालात म्हटले आहे.

निफ्टीमध्ये काही काळ कंसॉलिडेशन राहू शकते. अशात, फ्युचर्स सेगमेंटमध्ये मॅरिकोसारखे (Marico) स्टॉक चांगले परफॉर्म करु शकतात. आयसीआयसीआय डायरेक्टने तीन महिन्यांच्या दृष्टीकोनातून मॅरिकोवर बाय रेटींग दिले आहे.

मॅरिकोच्या (Marico) स्टॉकला 505-510 रुपयांवर खरेदीचा सपोर्ट कायम राहील असे त्यांनी म्हटले. याआधी, जवळपास तीन सिरिजमध्ये, स्टॉकने या पातळीवर ट्रेड केले आहे. स्टॉकमधील डाउनसाइड रिस्‍क लि‍मिटेड आहे.

सप्टेंबर सिरिजमध्ये, ते 540 च्या कॉलवर (ऑपर इंटरेस्ट) बंद होताना दिसत आहे. जुलै 2022 पासून हा शेअर 510 ते 550 च्या रेंजमध्ये आहे. हा स्टॉक 550 ची पातळी ओलांडण्यासाठी तयार आहे आणि इथून स्टॉकमध्ये ब्रेकआउट दिसू शकतो असे सर्व इंडिकेटर्स संकेत देत आहेत.

इक्विटी रिसर्च फर्म आयसीआयसीआय डायरेक्टने मॅरिकोवर बाय रेटींग दिले आहे. 3 महिन्यांच्या दृष्टीकोनातून 610 रुपयांचे टारगेट देण्यात आले आहे. खरेदीचा दर अर्थात बाइंग रेंज 540-547 रुपये ठेवली आहे. स्टॉकला 500 रुपयांचा स्टॉप लॉस ठेवावा लागेल असा सल्ला त्यांनी दिला.

26 सप्टेंबर 2022 ला स्टॉक 526 रुपयांवर होता. सध्याच्या पातळीवरून, हा स्टॉक येत्या 3 महिन्यांत अंदाजे 16 टक्के परतावा देऊ शकतो. या वर्षी आतापर्यंत स्टॉकचा परतावा जवळजवळ सपाट आहे. 52 आठवड्यांच्या उच्चांकावरून, हा स्टॉक सुमारे 13 टक्क्यांच्या डिस्काउंटवर आहे. स्टॉकने 18 ऑक्टोबर 2021 रोजी एनएसईवर 607.70 रुपयांवर 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला होता.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com