Share Market : शेअर बाजाराच्या घसरणीदरम्यान 'हा' शेअर देईल चांगला परतावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

share market

Share Market : शेअर बाजाराच्या घसरणीदरम्यान 'हा' शेअर देईल चांगला परतावा

शुक्रवारी शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. आजच्या ट्रेडिंग सत्रात बँकिंग, आयटी, रियल्टी, फायनान्शिअल शेअर्समध्ये दबाव दिसून आला. अशा स्थितीत गुंतवणूकदारांनी कोणत्या सेक्टरवर, कोणत्या शेअरमध्ये पैसे गुंतवावेत जेणेकरुन येत्या काळात चांगला नफा कमावता येईल यासाठी शेअर बाजार तज्ज्ञ मदत करत आहेत. मार्केट एक्सपर्ट संदीप जैन यांनी डॉलर इंडस्ट्रीजमध्ये (Dollar Industries) पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला आहे. दिवाळीपूर्वी सणासुदीच्या काळात मागणी दिसून येत आहे, त्यामुळे या क्षेत्राची वाढ होण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

  • डॉलर इंडस्ट्रीज (Dollar Industries)

  • सीएमपी (CMP) - 515.90 रुपये

  • टारगेट (Target) - 570/590 रुपये

कंपनी काय करते ?

डॉलर इंडस्ट्रीज (Dollar Industries) ही कंपनी इनरवेअरपासून थर्मल्सही बनवते. आता हिवाळा येणार आहे, ज्याचा फायदा कंपनीला मिळेल. कंपनी पूर्णपणे भारतात कार्यरत आहे आणि कंपनीचा देशातील बाजारपेठेतील हिस्सा 15 टक्के आहे. देशांतर्गत बाजारात कंपनीची चांगली पकड असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. डॉलर इंडस्ट्रीजमध्ये (Dollar Industries) प्रमोटर्सचा हिस्सा 75 टक्के आहे. याशिवाय देशी-विदेशी गुंतवणूकदारांची गुंतवणूक सुमारे 2.5 टक्के आहे.

कंपनीचे फंडामेंटल्स ?

डॉलर इंडस्ट्रीजचा (Dollar Industries) स्टॉक 20 च्या मल्टीपलवर ट्रेड करतो. याशिवाय रिटर्न ऑन इक्विटी 24 टक्के आहे. शिवाय कंपनीच्या नफ्याचा CAGR 30 टक्के झाला असून कंपनीचे मार्जिनही चांगले आहे. जून 2021 मध्ये कंपनीने 23 कोटी रुपयांचा नफा सादर केला होता, तर जून 2022 मध्ये कंपनीने 28 कोटी रुपयांचा नफा सादर केला होता.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.