Stock: 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा हा शेअर तज्ज्ञांचा फेव्हरेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

share market

Stock: 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा हा शेअर तज्ज्ञांचा फेव्हरेट

शेअर बाजारात सध्या तेजी दिसून येत आहे. अशात तुम्हाला शेअर बाजारात पैसे गुंतवून चांगला नफा कमवायचा असेल तर ही चांगली वेळ आहे. आता तुम्ही दर्जेदार शेअर्सच्या शोधात असाल, तर बाजार तज्ज्ञ संदीप जैन यांनी खरेदीसाठी मजबूत स्टॉक निवडला आहे. संदीप जैन यांनी खरेदीसाठी Grauer आणि Weil Ltd ची निवड केली आहे. 1940 मध्ये दोन ब्रिटिश व्यावसायिकांनी ही कंपनी सुरू केली होती.

हेही वाचा: Share Market: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी पडझड, आयटी, बॅंकीगच्या शेअर्समध्ये घसरण

कंपनी काय करते ?

Grauer आणि Weil Ltd ही कंपनी सरफेस फिनिशिंग क्षेत्रात काम करते. शिवाय जनरल मेटल फिनिशिंग उद्योगांतर्गत काम करते, यासह  पेंट्स, ल्युब्रिकेंट्स, केमिकल्स, इंजीनियरिंगसारखे उत्पादने तयार करते. या कंपनीचे रेटिंग मजबूत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले .

Grauer and Weil Ltd

सीएमपी (CMP) - 72.25 रुपये

टारगेट (Target) - 80/85 रुपये

हेही वाचा: Share Market : 9 रुपयांचा शेअर पोहोचला तब्बल 3,700 रुपयांवर; गुंतवणुकदार कोट्यधीश

कंपनीचे फंडामेंटल्स ?

ही कंपनी 17-18 च्या PE मल्टिपलवर व्यापार करते. कंपनीवरील कर्ज खूपच कमी आहे आणि ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन सुमारे 15 टक्के आहे. जून 2021 मध्ये कंपनीने 20 कोटी रुपयांचा नफा सादर केला होता, तर जून 2022 मध्ये कंपनीने 29 कोटी रुपयांचा नफा सादर केला होता. याशिवाय कंपनीत प्रमोटर्सची हिस्सेदारी 69 टक्के आहे. याशिवाय कंपनीत देशी आणि विदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा जवळपास 1-1.15 टक्के आहे. गुंतवणूकदारांना या शेअरमध्ये पैसे गुंतवण्याची चांगली संधी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

हेही वाचा: Share Market : हे 2 दमदार स्टॉक्स देतील भरघोस कमाई, तज्ज्ञांना विश्वास

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Web Title: This Stock Priced Below Rs 100 Is The Experts Favorite Dds97

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..