नवीन वर्ष आणि ख्रिसमसच्या सुट्ट्यांत भटकंतीसाठी बंपर ऑफर्स

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 12 December 2020

जर नवीन वर्षासाठी आपण सुट्टीचे नियोजन करीत असाल तर ही संधी खूप उत्तम ठरणारी आहे. कारण यावर्षी एअरलाइन्सने नवीन वर्षाच्या तिकिटाची किंमत वाढवण्याऐवजी कमी केली आहे.

पुणे : कोरोना संकटाच्यावेळी एअरलाइन्सने बराच व्यवसाय गमावला आहे. आता त्यांना त्यांची कमाई वाढवायची आहे. यासाठी नवीन वर्ष आणि ख्रिसमसमुळे स्वस्त फ्लाईट्सचे ऑफर मिळत आहे, जेणेकरून अधिकाधिक लोक फ्लाईटने प्रवास करतील. जर आपणही नवीन वर्ष किंवा ख्रिसमसच्या सुट्टीची तयारी करत असाल तर एकदा तुम्ही फ्लाईट्सचे तिकिट पाहाल तर तुम्हाला विश्वासच बसणार नाही. 

कोरोना महामारीच्या दिवसामध्ये आपल्यातील बहुतेक लोक घरात बसून कंटाळले असतील. जर नवीन वर्षासाठी आपण सुट्टीचे नियोजन करीत असाल तर ही संधी खूप उत्तम ठरणारी आहे. कारण यावर्षी एअरलाइन्सने नवीन वर्षाच्या तिकिटाची किंमत वाढवण्याऐवजी कमी केली आहे. हे नवीन वर्ष तुम्हाला संस्मरणीय करण्यासाठी आपण नक्कीच सुट्टीवर जाऊ शकता, तेही जेव्हा एअरलाईन्सने तिकिटांच्या किंमतीत 25-30 टक्के कपात केली आहे. बर्‍याच ठिकाणी पाच ते सहा हजार रुपयात रिटर्न तिकिटे उपलब्ध आहेत.

मुंबईहून एअरलाईन्सचे रिटर्न तिकिट स्वस्त 

जर आपण मुंबई येथे राहत असाल तर मग मुंबईहून काही सुट्टीच्या ठिकाणांच्या रिटर्न फ्लाईटच्या किंमती पहाच.

- मुंबई ते उदयपूरला रिटर्न फ्लाइट फक्त 5 हजार 887 रुपयांत उपलब्ध आहेत, म्हणजेच सहा हजार रुपयांपेक्षा कमी आहे. 
- मुंबई ते कोची अशी तिकिटे सहा हजार रुपयांच्या आसपास आहे. 
- सहसा मुंबई ते गोव्याचे रिटर्न तिकीट आजकाल खूप वाढलेले आहे, परंतु यावर्षी हे 7200 रुपयाला मिळत आहे.
- तुम्हाला 6500 रुपयांमध्ये मुंबई ते जयपूर फ्लाइट आहे.

मुंबई ते गुवाहाटीचे तिकीट जवळपास 9500 रुपये मिळत आहे. मुंबई- बागडोग्रा येथून सिक्कीम आणि दार्जिलिंगलाही जाता येते, तेथून रिटर्न तिकिटात केवळ 11500 रुपये आहे. जर आपल्याला (गोल्डन टेंपल) सुवर्ण मंदिराचे दर्शन घेऊन नवीन वर्षाची सुरवात करायची असेल तर आपल्याला 11 हजारात रिटर्नचे तिकीट मिळेल. 

जर तुम्ही पर्वतावर जाण्याचा विचार करीत असाल तर ख्रिसमस आणि न्यू इयर दरम्यान मसूरी आणि देहरादूनचा परिसर पाहण्यासारखा आहे. मुंबई-देहरादूनच्या मसूरीसाठी तिकिटे फक्त 11 हजार रुपये आहे. मनाली ते मुंबई-चंदीगडमधील रिटर्नचेफ्लाईट्सचे भाडे 9 हजार रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तसेच मुंबई-श्रीनगरचे तिकिट फक्त 11500 हजार इतके आहे.

आपल्याला अधिक स्वस्त तिकिट मिळेल

जर आपण 25 डिसेंबर किंवा 31 डिसेंबर रोजी फ्लाइट बुकिंग केले तर तिकिटांची किंमत कमी आहे. आजकाल बर्‍याच वेबसाइट्स कूपन ऑफर करत आहेत आणि कमी शुल्कात मोफत तिकीट रद्द करण्याची ऑफर देखील देतात. याचा अर्थ असा की जर आपण जाण्यास असमर्थ असाल तर सर्व पैसे परत केले जातील आणि कोणतेही शुल्क रद्द होणार नाही. तर आपल्या पसंतीच्या सुट्ट्या जोरदारपणे साजरी कराच. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tickets for flights on New Years and Christmas days have become 30 percent cheaper