आर्थिक नुकसान टाळायचे आहे, मग लक्षात घ्या 'ही' पंचसूत्री

विजय तावडे
Thursday, 4 June 2020

आर्थिक समृद्धीसाठी आणि आर्थिक स्थैर्यासाठी सर्वजण मेहनत करतात, जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करतात. बचत करून भविष्याची तरतूद करतात. त्यासाठी गुंतवणूकसुद्धा करतात. परंतु असे असूनसुद्धा बऱ्याचवेळा काही चुकांमुळे किंवा निर्णयांमुळे अनेकांना आर्थिक नुकसान सहन करावे. कष्टाने मिळवलेला आणि काटकसर करून वाचवलेला पैसा काही चुकांमुळे किंवा चुकीच्या निर्णयांमुळे गमवावा लागतो.

आर्थिक समृद्धीसाठी आणि आर्थिक स्थैर्यासाठी सर्वजण मेहनत करतात, जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करतात. बचत करून भविष्याची तरतूद करतात. त्यासाठी गुंतवणूकसुद्धा करतात. परंतु असे असूनसुद्धा बऱ्याचवेळा काही चुकांमुळे किंवा निर्णयांमुळे अनेकांना आर्थिक नुकसान सहन करावे. कष्टाने मिळवलेला आणि काटकसर करून वाचवलेला पैसा काही चुकांमुळे किंवा चुकीच्या निर्णयांमुळे गमवावा लागतो. आर्थिक नियोजन करण्याबरोबरच आपण काही बाबींसंदर्भात जर जागरूक असलो तर आपले आर्थिक नुकसान टाळता येईल किंवा त्याची व्याप्ती कमी करता येईल. कारण पैसा कमावण्याइतकेच तो सांभाळणेदेखील खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे आर्थिक बाबींसंदर्भातील काही निर्णय, भावनिक मुद्दे लक्षात घेणे गरजेचे ठरते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

१) बनावट योजनांपासून सावध
संपत्ती निर्मिती ही एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे. झटपट पैसा कमावण्याच्या किंवा पटकन श्रीमंत होण्याच्या मोहामुळे अनेकजण ट्रॅपमध्ये अडकतात. अनेक बनावट योजना ज्यांना 'पॉन्झी स्कीम' असेही म्हणतात, कमी कालावधीत खूप जास्त परतावा देण्याचे आश्वासन देत असतात. बाजारात अधिकृतपणे आणि सुरक्षित माध्यमातून उपलब्ध असलेल्या योजनांपेक्षा किंवा गुंतवणूक प्रकारांपेक्षा या प्रकारच्या योजना अधिक परतावा देण्याचे आश्वासन ग्राहकांना देत असतात. 

'ही' कंपनी करणार कर्मचाऱ्यांच्या वेतनात १५ टक्क्यांची वाढ

कोणत्याही गुंतवणूक प्रकाराद्वारे परतावा देण्याचे एक मॉडेल असते. त्यात एक प्रकारची प्रक्रिया असते. त्यापेक्षा अधिक परतावा योग्य मार्गाने मिळू शकत नाही. मात्र जेव्हा कोणतीही योजना किंवा गुंतवणूकीचे माध्यम जेव्हा तुम्हाला बाजारातील अधिकृत आणि योग्य गुंतवणूक योजनांपेक्षा किंवा प्रकारांपेक्षा खूप जास्त परतावा देण्याचे आश्वासन देते तेव्हा त्यात मोठी जोखीम आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. गुंतवणूकदारांना मोहात पाडून पैसे गोळा करण्याचा हा ट्रॅप असू शकतो. कष्टाने कमावलेला पैसा तुम्ही मोहाला बळी पडून गमावू शकता.

भारतीय बॅंकांना आगामी काळात गरज २० ते ५० अब्ज डॉलरची

२) क्रेडिट कार्डाचा योग्य वापर
क्रेडिट कार्ड ही अलीकडच्या काळात लोकप्रिय होत असलेली सुविधा आहे. खिशात पैसे नसतानाही आपल्याला वस्तू खरेदी करण्याचे किंवा सेवा घेण्याची सुविधा यामुळे उपलब्ध होत असते. क्रेडिट कार्डाचा वापर करून आपण केलेल्या खर्चाची रक्कम आपल्याला ठराविक कालावधीनंतर बॅंकेला किंवा वित्तसंस्थेला परत करावयाची असते. मात्र जर आपण निर्धारित वेळेत या रक्कमेची परतफेड केली नाही तर खूप मोठा व्याजदर ( सर्वसाधारणपणे ३० ते ३३ टक्के) थकलेल्या रकमेवर आकारला जातो. दरमहिन्याला ही रक्कम वाढत जाते आणि मग आपल्याला त्या रकमेची परतफेड करणे कठीण होऊन बसते. त्यामुळेच क्रेडिट कार्डचा वापर शिस्तबद्धपणे करा आणि आलेल्या बिलांचे पूर्ण भूगतान दरमहिन्याला करा.

आर्थिक नियोजन करताना 'हे' लक्षात घ्या

३) संयम बाळगा
आर्थिक व्यवहार, गुंतवणूक यासंदर्भात बहुतांश लोक घाईघाईने किंवा भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेताना दिसतात. यामुळे अनेकदा आर्थिक नुकसान होते. त्यामुळे गुंतवणूक किंवा आर्थिक विषयांच्या बाबतीत संयमाने वाटचाल करणे आवश्यक आहे. दीर्घकालात त्याचे चांगले लाभ मिळतात.

४) क्षमतेपेक्षा अधिक जोखीम टाळा 
आपली जोखीम क्षमता, वयोगट, उत्पन्न लक्षात घेऊनच गुंतवणूक करणे आवश्यक असते. गुंतवणुकीचे एक महत्त्वाचे सूत्र आहे. ते म्हणजेच जोखीम कमी तर परतावा कमी, जोखीम जास्त तर परतावासुद्धा जास्त. आपल्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओमध्ये जोखीम आणि परताव्याचे योग्य ते संतुलन राखणे खूप महत्त्वाचे असते. परंतु बऱ्याचवेळा अनेक गुंतवणूकदार जास्त परताव्याच्या मोहाने क्षमतेपेक्षा अधिक जोखीम घेतात, अधिक जोखमीच्या गुंतवणूक प्रकारात गुंतवणूक करतात. यामुळे अनेक वेळा त्यांना आर्थिक संकटाला किंवा अस्थैर्याला सामोरे जायची वेळ येते. 

५) खरोखरच आवश्यकता असेल तरच कर्ज घ्या
अलीकडे कर्ज घेणे हे तुलनात्मकरित्या सोपे झाले आहे. ऑनलाईन पद्धतीने प्रक्रिया करून चटकन कर्ज मिळते. अधिक व्याजदर असूनसुद्धा पर्सनल लोन हा कर्जाचा प्रकार लोकप्रिय झालेला आहे. कारण कोणत्याही वैयक्तिक आर्थिक गरजेसाठी पैसा उपलब्ध होत असतो. मात्र कर्जाचे उद्दिष्ट, त्याची संकल्पना लक्षात घेणे गरजेचे आहे. खरोखरच गरज असेल तर कर्ज घ्यावे. क्षमतेपेक्षा जास्त आणि खरोखरच गरज नसताना निव्वळ हौसमौज पूर्ण करण्यासाठी किंवा अनावश्यक वस्तू घेण्यासाठी घेतलेले कर्ज आपली पत घटवत असते. कर्जाची परतफेड करताना त्यामुळे ग्राहकांची दमछाक होत असते. या ट्रॅपपासून सावध असावे. अन्यथा मेहनत करूनसुद्धा आर्थिक स्थैर्य लाभणार नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tips to avoide financial losses