esakal | एचपी, लिनोव्हो, डेल आणि Apple : ३ महिन्यांची कामगिरी कशी?
sakal

बोलून बातमी शोधा

Laptop

एचपी, लिनोव्हो, डेल आणि Apple : ३ महिन्यांची कामगिरी कशी?

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

देशात 2021 सालच्या पहिल्या तिमाहीत पीसी शिपमेंटमध्ये (टॅबलेटसह) वर्षात 72 % वाढ झाली असून ती 4.0 मिलीयन युनिटपर्यंत पोचली आहे. यात 517,000 डेस्कटॉप, 2.5मिलीयन नोटबुक, 930,000 टॅब्लेट आणि 43,000 वर्कस्टेशन्स आहेत. रिपोर्टनुसार या सर्वच कॅटेगरीमध्ये मागील वर्षापेक्षा चांगली वाढ नोंदवण्यात आली असल्याचे समोर आले आहे. (top performed companies in indias pc market in first three months of 2021)

नोटबुक (मोबाईल वर्कस्टेशन्ससह) या डिव्हाईस कॅटगरीमध्ये सर्वात जास्त वाढ झाली असुन, Q1 2020 च्या तुलनेत शिपमेंटमध्ये 119% वाढ झाली. टॅब्लेटमध्येदेखील 2016 नंतरची सर्वात मोठी तिमाही वाढ नोदवण्यात आली, ज्यामध्ये वार्षिक आधारावर 52% वाढ झाली आहे. डेस्कटॉप शिपमेंटमध्ये 6 % घसरण होऊ ती 517,00 युनीट इतकी नोदवली गेली. आज आपण वर्षाच्या पहिल्या तिमाहीत टॉप परफॉर्मर ठरलेल्या पाच कंपन्यांबद्दल जाणून घेणार आहोत.

एचपी (HP) पहिला क्रमांकावर

एचपीने (HP) लिनोव्होला (Lenovo) मागे टाकत या रेस मध्ये पहिला क्रमांक मिळवला. 2021 च्या तुलनेत पहिल्या क्वार्टरमध्ये 102 % वाढ झाली. या वर्षात त्यावरील अडथळे कमी झाल्याने भारताने या उपकरणांचा चांगला पुरवठा केला, विशेषत: नोटबुक शिपमेंटमध्ये 121% वाढ झाली.

हेही वाचा: देशातील 70 टक्के हॉटेल्स बंद पडण्याच्या मार्गावर

लिनोव्हो (Lenovo)

एचपी पुढे गेल्याने लिनोव्हो (Lenovo) दुसर्‍या क्रमांकावर पडला, लिनोव्हो मध्ये Q2021 च्या वर्षात 63% वर्षी वाढ झाली. ही कंपनीची या काळात एकूण बाजारपेठेपेक्षा खूपच मंद गतीने वाढ झाली. प्रामुख्याने भारत आणि चीनमधील राजकीय तणावांमुळे लिनोव्होने सरकारी टेंडरसाठी स्पर्धा करणे टाळले होते. तसेच काही सरकारी संस्थांचा विश्वास संपादन करण्यासाठी कंपनीने 'मेक इन इंडिया' उपक्रम राबविण्यावर लक्ष केंद्रित केले. तसेच नुकतेच कंपनीमध्ये मोठे बदलही झाले असून शैलेंद्र कात्यल यांनी राहुल अग्रवाल यांच्याकडून कंपनी व्यवस्थापनाचा पदभार स्वीकारला आहे.

डेल (Dell)

मार्केट शेअरीच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या डेलची (Dell) पहिल्या पाच विक्रेत्यांमधील सर्वात कमी वेगाने वाढ झाली डेस्कटॉप व्यवसायात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. पहिल्या पाचपैकी सर्वात कमी वेगाने वाढ झाल्याने डेल कंपनीचे ग्राहकांकडे लक्ष नाही. कंपनीची उद्योजकांमधील आणि कमर्शियल ग्राहकांमध्ये असलेल्या लोकप्रियतेमुळे त्याचे शिपमेंट व्हॉल्यूम राखण्यास कंपनीला मदत झाली आहे. पहिल्या तीन टॉप विक्रेत्यांपैकी, डेलकडे लेटेस्ट इंटेल चिपसेटची लेटेस्ट जनरेशन वापरणारे अनेक डिव्हाईस आहेत, ज्यामुळे एंटरप्राइझ आणि व्यावसायिक बाजारात त्याचे स्थान आणखी वाढविण्यात मदत होईल.

सॅमसंग (Samsung)

सॅमसंगने (Samsung) आपल्या टॅब्लेट व्यवसायाच्या जोरावर या यादीत चौथ्या स्थानावर झेप घेतली. सॅमसंग हे अशा काही Android टॅबलेट विक्रेत्यांपैकी एक आहे जे मोठ्या ऑर्डरची पूर्तता करू शकतात, विशेषत: महामारीच्या काळात सॅमसंगचा टॅब्लेट व्यवसाय हा सरकारच्या डिजीटलायझेशन धोरणामुळे तसेच सार्वजनिक शाळा आणि संस्थांमध्ये इलर्निंगसाठी उपकरण खरेदीमुळे वाढला आहे.

हेही वाचा: परीक्षाच दिली नाही तर रुग्णांवर उपचार कसे करणार; SC चा सवाल

Apple पाचव्या क्रमांकावर

Apple ने नुकतेच एसर कंपनीला मागे सोडत टॉप पाच कंपन्यांच्या यादीतून बाद केले आहे. Apple कंपनीच्या या कामगीरीमागे त्यांचे स्ट्रॉंग नोटबुक आणि टॅब्लेट पोर्टफोलिओ असण्याचा फायदा झाला. हा पोर्टफोलिओ कंपनीने ग्राहक केंद्रीत ठेवला होता. दरम्यान या काळात Apple कंपनीच्या नोटबुक आणि टॅब्लेटची निर्यात ही 208 हजार युनिट्सपर्यंत वाढली आहे. त्यांच्या देशभरात असलेल्या अधिकृत ऑनलाइन स्टोअर्समुळे कंपनीला त्याच्या उत्पादन विक्रीत वाढ होण्यास मोठी मदत झाली.

(top-performed-company-in-indias-pc-market-in-first-three-months-of-2021)