"जीएसपी'बाबतचा निर्णय  पुढे ढकलावा: तुलसी गबार्ड 

पीटीआय
शुक्रवार, 29 मार्च 2019

वॉशिंग्टन:  भारताला असलेला "जीएसपी' दर्जा काढून घेण्याबाबतचा निर्णय अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेथील लोकसभेची निवडणूक पार पडेपर्यंत पुढे ढकलावा, अशी अपेक्षा अमेरिकी सिनेटमधील पहिल्या हिंदू वंशीय खासदार तुलसी गबार्ड यांनी व्यक्त केली. 

यूएस-इंडिया फ्रेंडशिप कौन्सिलच्या वतीने आयोजित परिषदेत त्या बोलत होत्या. गबार्ड म्हणाल्या, ""व्यापार क्षेत्रात भारत व अमेरिकेदरम्यानच्या द्विपक्षी भागिदारीला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. भारताचा "जीएसपी' दर्जा काढून घेण्याचा निर्णय ट्रम्प तूर्त लांबणीवर टाकतील, अशी मला आशा आहे. कारण या मुद्द्यावर राजकारणबाह्य चर्चा होणे महत्वाचे आहे.'' 

दरम्यान, काही खासदारांनीही याचे समर्थन केल्याचे या वेळी सांगण्यात आले. भारताला अमेरिकेसोबतच्या व्यापारात "जीएसपी'अंतर्गत विशेष सूट मिळते. या योजनेचा भारत मोठा लाभार्थी असून, हा दर्जा काढून घेण्याचा आपला विचार असल्याचे ट्रम्प यांनी अमेरिकी सिनेटला नुकतेच कळविले आहे.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Trump should delay decision on terminating India from GSP programme