नरेंद्र मोदींनी कुठे गुंतवणूक केली आहे? माहिती आहे का?

वृत्तसंस्था
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट अर्थात एनएससीमध्ये पाच लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट अर्थात एनएससीमध्ये पाच लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. पंतप्रधान मोदींनी बँकेतील मुदत ठेवी आणि एनएससीमध्ये गुंतवणूक केली आहे. गेल्यावर्षी मोदींनी एनएससीमध्ये 5,18,235 रुपयांची गुंतवणूक केल्याचे सांगितले होते. या गुंतवणूक प्रकारामध्ये पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून गुंतवणूक करता येते. 

पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून एनएससीमध्ये गुंतवणूक करता येते. एनएससीमध्ये किमान 100 रुपयांपासून गुंतवणूक करता येते. शिवाय दरवर्षी चक्रवाढ पद्धतीने व्याज मिळते. मात्र एनएससीची मुदत संपल्यावरच मूळ रक्कम व व्याज एकत्रित दिले जाते. एनएससीमधल्या गुंतवणुकीवर प्राप्तिकराच्या 80 सी कलमांतर्गत करवजावट मिळते. 

केंद्र सरकारने अल्प बचत मुदत ठेवींवरील व्याजदर 'जैसे थे' ठेवण्याचा निर्णय नुकताच घेतला. अल्प बचत योजनांवर गुंतवणूकदारांना आधीप्रमाणेच 7.9 टक्के इतके व्याज मिळणार आहे. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये पाच वर्षांसाठी एक लाख रुपयांची गुंतवणूक केली तर पाच वर्षांनी तुम्हाला सुमारे 1 लाख 46 हजार रुपये मिळतील किंवा दोन लाख रुपये पाच वर्षांसाठी गुंतवल्यास 2 लाख 92 हजार 507 रुपये इतकी एकूण रक्कम मिळेल. बँकेतील मुदत ठेवींपेक्षा एनएससीमध्ये जास्त व्याज मिळत असल्याने मुदतपूर्तीवेळी अधिक रक्कम प्राप्त होते. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Turn Rs 1 Lakh into Rs 1 Lakh 46 thousand with this scheme where PM Modi has invested