इथेनॉलवर चालणारी बाईक बघितली का?

इथेनॉलवर चालणारी बाईक बघितली का?

नवी दिल्ली: इथेनॉलवर चालणारी देशातील पहिली मोटरसायकल टीव्हीएसने विकसित केली असून, नुकतेच तिचे अनावरण देशाचे रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत व टीव्हीएस मोटर कंपनीचे अध्यक्ष वेणू श्रीनिवासन यांच्या हस्ते करण्यात आले. टीव्हीएसने सर्वात आधी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या वाहन मेळाव्यात इथेनॉलवर चालणाऱ्या अपाचे आरटीआर २०० ची संकल्पना मांडली होती. त्यानंतर कंपनीने आपले वाहन बाजार दाखल केले आहे.


इथेनॉल हे अपारंपरिक इंधन असून, त्याची निर्मिती उसापासून करण्यात येते. इथेनॉल विषारी नसून, बायोडिग्रेबल आहे. हाताळणी, साठवण आणि वाहतूक या सर्व दृष्टीने ते सुरक्षित आहे. ते जळत असताना त्यातून नायट्रोजन ऑक्‍साईड उत्सर्जनाचे प्रमाण कमी असते. तसेच ते कार्बन मोनॉक्‍सईड उत्सर्जन, पर्टिक्‍युलेट मॅटर व सल्फर-डाय-ऑक्‍साईड यांचे प्रमाण कमी करण्यातदेखील मदत करते. इंधन म्हणून इथॅनॉल वापरल्यास पेट्रोलियम आयातीवर अवलंबून राहण्याचे प्रमाण कमी होईल व देशाची ऊर्जा सुरक्षा वाढेल अशा आशावाद या वेळी व्यक्‍त करण्यात आला. 


आज दुचाकी वाहन उद्योग क्षेत्र इलेक्‍ट्रिक, हायब्रीड व पर्यायी इंधन अशा सर्व विभागांमध्ये हरित व चिरस्थायी आधुनिक सुविधा निर्माण करण्याबाबत विचार करत आहे. इथेनॉलवर चालणारी उत्पादने हा आमच्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाचा पर्याय आहे. इथेनॉलच्या बाबतीत सहज अनुकूलता असल्यामुळे आणि कामगिरी; तसेच गाडीच्या मालकीसाठी कराव्या लागणाऱ्या खर्चाच्या बाबतीत अजिबात तडजोड करावी न लागता पर्यावरणाची हानी टाळता येणार आहे. 


 विविध प्रकारच्या स्थितीमध्ये ही गाडी अधिक चांगली शक्ती व अधिक चांगली कामगिरी देते. या मोटरसायकलची अतिशय प्रभावी सर्वात जास्त शक्ती ८५०० आरपीएमला २१ पीएस व टॉर्क ७००० आरपीएमला १८.१ एनएम आहे.  ही गाडी दर तासाला १२९ कि.मी. इतका सर्वात जास्त वेग गाठू शकते. ही गाडी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश व कर्नाटकमध्ये १ लाख २० हजार रुपये या किमतीत उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे टीव्हीएस मोटर कंपनीचे अध्यक्ष वेणू श्रीनिवासन यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com