'या' नऊ क्षेत्रात दोन लाख लोकांना मिळाला रोजगार! एकूण संख्या झाली 3.10 कोटी | Arthavishwa | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'या' नऊ क्षेत्रात 2 लाख लोकांना मिळाला रोजगार! एकूण संख्या 3.10 कोटी
'या' नऊ क्षेत्रात दोन लाख लोकांना मिळाला रोजगार! एकूण संख्या झाली 3.10 कोटी

'या' नऊ क्षेत्रात 2 लाख लोकांना मिळाला रोजगार! एकूण संख्या 3.10 कोटी

कोविड-19 (Covid-19) महामारीमुळे जगभरातील उद्योग-व्यवसायांना मोठा आर्थिक फटका बसला. लाखो लोकांचे रोजगार या कोरोना साथीच्या रोगाने हिरावून घेतले. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटमुळे (Delta Veriant) जीवितहानी मोठ्या प्रमाणात झाली. उद्योग (Industry) विश्‍वालाही मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता जनजीवन पूर्वपदावर येत आहे. कोविड-19 महामारीच्या दुसऱ्या लाटेनंतर राज्यांनी लॉकडाउनचे (Lockdown) निर्बंध उठवल्यामुळे आर्थिक चलनवलनात सुधारणा झाली आणि रोजगाराच्या संधीही वाढल्या. उत्पादन, बांधकाम (Construction), व्यापार (Trade), वाहतूक (Transportation), शिक्षण (Education), आरोग्य (Health), गृहनिर्माण (Housing) आणि रेस्टॉरंट्‌स (Restaurants), IT / BPO (Business Process Outsourcing) आणि वित्तीय सेवा (Financial Services) यांसारखी नऊ क्षेत्रे लोकांना रोजगार देतात. (Two lakh people are employed in these nine regions of India)

कामगार मंत्रालयाने (Ministry of Labour) सोमवारी जारी केलेल्या त्रैमासिक रोजगार सर्वेक्षणानुसार, जुलै - सप्टेंबर 2021 दरम्यान निवडक नऊ क्षेत्रांमध्ये एकूण रोजगार 3.10 कोटी होता, जो एप्रिल - जूनच्या तुलनेत दोन लाख अधिक आहे.

हेही वाचा: आर्मी पब्लिक स्कूलमध्ये 8700 शिक्षक पदांची भरती! अर्जप्रक्रिया सुरू

श्रम आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव (Bhupendra Yadav) यांनी श्रम ब्यूरोने (Labour Bureau) तयार केलेले त्रैमासिक रोजगार सर्वेक्षण (QES) जारी केले, त्यानुसार एप्रिल ते जून 2021 मध्ये निवडलेल्या नऊ क्षेत्रांमध्ये एकूण रोजगार 3.08 कोटी होता. या मालिकेमधील हा दुसरा रिपोर्ट आहे. पहिला अहवाल एप्रिल - जून 2021 चा होता. या अभ्यासामध्ये 10 किंवा अधिक कर्मचारी असलेल्या आस्थापनांचा समावेश करण्यात आला होता. अहवाल जारी करताना यादव म्हणाले की, या अभ्यासांमुळे पुराव्यावर आधारित धोरण तयार करण्यात सरकारला मदत होईल.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top