'टेलिकॉम वॉर'मध्ये या उद्योगपतीने गमावले 21 हजार 529 कोटी रुपये

वृत्तसंस्था
Friday, 22 November 2019

मुंबई: देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आणि आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांना 3 अब्ज डॉलरचा तोटा झाला आहे. देशातील दूरसंचार क्षेत्रातील आर्थिक संकटामुळे व्होडाफोन आयडियाला आतापर्यतच्या सर्वात मोठ्या तोट्याला सामोरे जावे लागले आहे. त्याचा मोठाच फटका कुमार मंगलम बिर्ला यांना बसला आहे. कारण व्होडाफोन आयडियामधील दुसरे सर्वात मोठे गुंतवणूकदार कुमार मंगलम बिर्ला आहेत. बिर्ला यांच्या आयडिया सेल्युलरने मागील वर्षी व्होडाफोन या ब्रिटिश दूरसंचार कंपनीबरोबर विलीनीकरण केले होते.

मुंबई: देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आणि आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांना 3 अब्ज डॉलरचा तोटा झाला आहे. देशातील दूरसंचार क्षेत्रातील आर्थिक संकटामुळे व्होडाफोन आयडियाला आतापर्यतच्या सर्वात मोठ्या तोट्याला सामोरे जावे लागले आहे. त्याचा मोठाच फटका कुमार मंगलम बिर्ला यांना बसला आहे. कारण व्होडाफोन आयडियामधील दुसरे सर्वात मोठे गुंतवणूकदार कुमार मंगलम बिर्ला आहेत. बिर्ला यांच्या आयडिया सेल्युलरने मागील वर्षी व्होडाफोन या ब्रिटिश दूरसंचार कंपनीबरोबर विलीनीकरण केले होते. मात्र रिलायन्स जिओने उभ्या केलेल्या तगड्या आव्हानामुळे व्होडाफोन आयडियाच्या व्यवसायावर मोठाच परिणाम झाला आहे.

कुमार मंगलम बिर्ला यांची एकूण संपत्ती दोन वर्षांपूर्वी म्हणजे 2017 मध्ये 9.1 अब्ज डॉलर इतकी होती. मात्र आता त्यांची संपत्तीत घटून 6 अब्ज डॉलरवर आली आहे. दूरसंचार क्षेत्रातील तोट्याचा परिणाम बिर्ला यांच्या समूहावर आणि त्यांच्या संपत्तीवर झाला आहे. बिर्ला समूह केमिकल्स, धातू, सिमेंट आणि दूरसंचार अशा विविध क्षेत्रांमध्ये आघाडीवर आहे. मात्र मागील दोन वर्षांत या सर्वच क्षेत्रातील बिर्ला यांच्या कंपन्यांच्या कामगिरीवर मंदावलेल्या अर्थव्यवस्थेचा परिणाम झाला आहे. त्यामुळे त्यांच्या कंपन्यांच्या शेअरच्या किंमतीमध्येही घसरण झाली आहे. त्याचाच परिणाम होत कुमार मंगलम बिर्ला यांची संपत्ती घटली आहे.

आदित्य बिर्ला समूहाच्या हिंडाल्को इंडस्ट्री लि., ग्रासिम इंडस्ट्रीज लि. या आघाडीच्या कंपन्या आहेत. हिंडाल्को इंडस्ट्रीज ही जगातील सर्वात मोठी अॅल्युमिनियम उत्पादक कंपनी आहे. तर ग्रासिम इंडस्ट्रीज देशातील सर्वात मोठी सिमेंट उत्पादक कंपनी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tycoon loses 3 billion dollar as India’s mobile war weighs on wealth