कर्ज घेण्यापूर्वी हे जाणून घ्या 

गुरुवार, 28 फेब्रुवारी 2019

सध्याच्या काळात कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकाला वस्तू आणि सेवा विकणाऱ्या कंपन्या बँकांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देत असतात. घर, दुकान, कार, टीव्ही, फर्निचर, मोबाईल किंवा एसी अशा आपल्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज बँकांकडून किंवा वित्तीय सेवा देणाऱ्या कंपन्यांकडून दिले जात असते. शिवाय आपल्या 'बजेट'पेक्षा बाहेर वस्तू जात असल्यास विक्रेत्याकडूनच कर्ज उपलब्ध करून देतो असे म्हणत ग्राहकाला कर्ज मिळवून देण्यात येते. ग्राहकाला देखील अवघ्या काही दिवसात तर बऱ्याचदा काही तासात कर्ज मंजूर होते आणि ग्राहक ती वस्तू घेऊन आपल्या घरी जातो. 

सध्याच्या काळात कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकाला वस्तू आणि सेवा विकणाऱ्या कंपन्या बँकांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देत असतात. घर, दुकान, कार, टीव्ही, फर्निचर, मोबाईल किंवा एसी अशा आपल्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज बँकांकडून किंवा वित्तीय सेवा देणाऱ्या कंपन्यांकडून दिले जात असते. शिवाय आपल्या 'बजेट'पेक्षा बाहेर वस्तू जात असल्यास विक्रेत्याकडूनच कर्ज उपलब्ध करून देतो असे म्हणत ग्राहकाला कर्ज मिळवून देण्यात येते. ग्राहकाला देखील अवघ्या काही दिवसात तर बऱ्याचदा काही तासात कर्ज मंजूर होते आणि ग्राहक ती वस्तू घेऊन आपल्या घरी जातो. 

मात्र बऱ्याचदा ग्राहकाला घाई असल्याने कर्ज घेण्यास होकार दर्शवितात. मात्र हे वैयक्तिक कर्ज म्हणून घेतले जाते. त्यावर मोठ्या प्रमाणावर व्याज आकारले जाते. त्यामुळे प्रत्येकाने कर्जाचे विविध प्रकार समजून घेणे गरजेचे आहे. कर्जाचे मुख्यतः दोन प्रकार आहेत. एक म्हणजे तारण / सुरक्षित कर्ज आणि दुसरे म्हणजे विनातारण कर्ज होय. 

1) विनातारण कर्ज: हे कर्ज घेताना आपल्याला कोणतीही वस्तू तारण ठेवण्याची गरज नसते. म्हणजेच आपल्याला सोने, मालमत्ता किंवा इतर किंमती वस्तू तारण ठेवाव्या लागत नाही. यामध्ये शैक्षणिक कर्ज किंवा वैयक्तिक कर्जाचा समावेश होतो. 

2) तारण / सुरक्षित कर्ज : तारण कर्ज म्हणजे कर्ज मिळविण्यासाठी ग्राहकाला आपल्याकडील वस्तू किंवा मालमत्ता तारण ठेवावी लागते. म्हणजेच ग्राहकाला जर निश्चित केलेल्या वेळेत कर्जाची परतफेड न करता आल्यास बँक तारण ठेवलेली मालमत्ता जप्त करू शकते आणि कर्जाची वसुली करू शकते.  

 कर्ज हे अल्पमुदतीसाठी आणि दीर्घकालावधीसाठी दिले जाते.

आता कोणकोणत्या कारणासाठी कर्ज दिले जाते ते बघू या. 
गृह कर्ज, वैयक्तिक कर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज, सोने तारण कर्ज, मुदत ठेवी अथवा आयुर्विमा तारण कर्ज, कृषी कर्ज आणि व्यावसायिक कर्ज अशा विविध प्रकारच्या कर्जाचे बँका आणि बिगर वित्तीय संस्थ्यांकडून कर्जाचे वाटप केले जाते. 

- गृह कर्ज : प्रत्येकाचे स्वप्न असते की एक घर असावे. मात्र बऱ्याचदा अशावेळी निधी उभारणे कठीण जाते. म्हणून अशावेळी बँकांकडून गृह कर्ज दिले जाते.  हे कर्ज दोन पद्धतीने उपलब्ध केले जाते निश्चित व्याजादरावर आणि बदलत्या व्याजादरावर. गृह कर्ज हे बऱ्याचदा 30 वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी देखील दिले जाऊ शकते. सध्या बहुतांश बँकांकडून कमीत कमी व्याजदरात गृह कर्ज दिले जाते. शिवाय गृहकर्ज घेतल्याचा प्राप्तिकरासाठी देखील फायदा होतो. 

- वैयक्तिक कर्ज :बहुतांश बँकांकडून किंवा बिगर वित्तीय संस्थांकडून वैयक्तिक कर्ज दिले जाते. ग्राहक वैयक्तिक गरजांकरिता कर्ज घेऊ शकतो. साधारणपणे या कर्जासाठी बँक काही मुलभूत कागदपत्रे घेतात. यामध्ये उत्पन्नाचे प्रमाणपत्र,ओळखपत्र. ह्या कर्जाचा फॉर्म दोन ते तीन पानांचा असतो आणि काही दिवसांतच कर्जाची मंजुरी देखील होते. विशेषतः वैयक्तिक कर्ज फक्त नोकरदार वर्गासाठी दिले जाते. वैयक्तिक कर्जावरील व्याजदर इतर कर्जाच्या व्याजदराच्या तुलनेत जास्त असतो. शिवाय वैयक्तिक कर्ज फेडीचा कालावधी देखील कमी  असतो. म्हणजेच वैयक्तिक कर्ज हे कमी रकमेचे आणि कमी कालावधी दिले जाते. 

वाहन कर्ज: वैयक्तिक आणि व्यावसायिक वापरासाठी चारचाकी असो दुचाकी असो किंवा  हे कर्ज तुमच्या वाहन घेण्याच्या स्वप्नाला पूर्ण करण्यात मदत करते. हे एक तारण कर्ज आहे म्हणजे जर तुम्ही वेळोवेळी कर्जाचे हफ्ते भरले नाही तर बँक तुमचे वाहन जप्त करू शकते.

शैक्षणिक कर्ज : विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कर्ज देण्यात येते. मुख्यतः हे 100 टक्क्यांपर्यंत कर्ज दिले जाते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीला रुजू झाल्यानंतर 
विद्यार्थी कर्ज फेडू शकता हे कर्ज भारतामध्ये व परदेशामध्ये शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना दिले जाते. ह्या कर्जाचा कालावधी हा 5 ते 7 वर्षांपर्यंत असू शकतो. तंत्रशिक्षण आणि वैद्यकीय शिक्षणासाठी बँका प्राधान्याने शैक्षणिक कर्ज देतात. 

सोने तारण कर्ज (Gold Loan) : भारतात सोने तारण ठेवून देखील कर्ज उपलब्ध करून दिले जाते. त्यामध्ये सोन्याची शुद्धता तपासली जाते. शिवाय शुद्ध सोन्याच्या मूल्याच्या 80 टक्क्यांपर्यंत कर्ज दिले जाते आहे. शिवाय सोन्याच्या कर्जावर वैयक्तिक कर्जाच्या व्याजदरापेक्षा कमी व्याजदर आकरले जाते. 

मुदत ठेवी वर कर्ज (Fixed Deposit Loan) :
बँकेत जर मुदत ठेव असेल तर त्यावर बँकेकडून कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. साधारणतः मुदत ठेवीच्या रकमेच्या 80 टक्के  कर्ज सुविधा मिळते. परंतु ह्या कर्जाचा व्याज दर हा मुदत ठेवी (Fixed Deposit) च्या व्याजदरापेक्षा 1 ते 2 टक्के  अधिक असतो. ह्या कर्जाची परतफेड मुदत ठेवीच्या परिपक्वता तारखेपुर्वी (Maturity Date) करायची असते. अन्यथा बँक ठेव रकमेच्या मुदतीनंतर या कर्जाची वसुली व्याजासहित करून घेते.

व्यावसायिक कर्ज (Commercial Loan) : व्यावसायिक कर्जासाठी व्यवसायाबद्दलची पूर्वकल्पना बँकेला द्यावी लागते. प्रत्येक बँक वेगवेगळ्या प्रकारे कर्जाचा निवाडा करते. ह्या कर्ज सुविधेसाठी व्यावसायिकाला आपल्या व्यवसायाचे चालू खाते उघडून त्यात समाधानकारक आर्थिक उलाढाल करावी लागते. व्यवसाय विस्तारासाठी आणि व्यवसाय सुरळीत चालण्यासाठी कॅश क्रेडीट सुविधा बँकामार्फात दिली जाते. उत्पादक कारणासाठी छोट्या उद्योगांना कच्चा माल आणि यंत्रसामुग्री खरेदीसाठी प्राधान्याने ही सुविधा दिली जाते. 

कृषी कर्ज : शेतकऱ्यांना शेती व्यवसायातून अधिक उत्पन्न मिळवण्याच्या उद्देशाने सहकारी बँका, क्षेत्रीय ग्रामीण बँका व सरकारी बँका विविध कारणासाठी प्राधान्याने कर्ज पुरवठा करतात. कृषी कर्ज खालील कारणासाठी दिले जाते. यामध्ये दुग्धपालन, कुक्कुटपालन अशा कृषिपूरक व्यवसायांकरिता हे कर्ज शेतकऱ्याला दिले जाते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Types of Loans & Credit