बेरोजगारीचा आलेख फेब्रुवारीमध्ये चढता

वृत्तसंस्था
Thursday, 7 March 2019

नवी दिल्ली - देशातील बेरोजगारीचे प्रमाण दरमहा वाढत असून, तरुणांना रोजगार देण्यास सरकारला अपयश आल्याचे समोर येत आहे.‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी‘ (सीएमआयई) या संस्थेच्या ताज्या अहवालानुसार फेब्रुवारी महिन्यात बेरोजगारीचे प्रमाण ७.२ टक्‍क्‍यांपर्यंत वाढले आहे. गेल्या अडीच वर्षांतील बेरोजगारीचे हे सर्वाधिक प्रमाण आहे.

निवडणुकीच्या तोंडावर बेरोजगारीची ताजी आकडेवारी सरकारची डोकेदुखी वाढविण्याची शक्‍यता आहे. 

नोकऱ्या कमी होत असल्याने श्रमशक्तीवर परिणाम झाला आहे. फेब्रुवारी २०१८ मध्ये बेरोजगारीचे प्रमाण ५.९ टक्के होते. यंदा फेब्रुवारी महिन्यात जवळपास ४० कोटी नोकऱ्या असल्याचा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात ४० कोटी ६० लाख नोकऱ्या अस्तित्वात असल्याचे ‘सीएमआयई’ने म्हटले आहे. या अहवालासाठी देशभरातील दहा हजारांहून अधिक घरांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले. ‘सीएमआयई’च्या जानेवारी महिन्यातील अहवालानुसार गेल्या वर्षभरात तब्बल एक कोटी नऊ लाख कामगारांनी नोकरी गमावली होती. याचा सर्वांत मोठा फटका ग्रामीण भारताला बसला असून, तेथे झपाट्याने बेरोजगारी वाढत असल्याबद्दल ‘सीएमआयई‘ने चिंता व्यक्त केली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unemployed Map Increase