खातेदारांनो, उद्यापासून होतोय सरकारी बॅंकांच्या कामकाजाच्या वेळेत बदल

वृत्तसंस्था
Thursday, 31 October 2019

 सरकारी बॅंकांच्या कामकाजाच्या वेळेत उद्यापासून म्हणजेच 1 नोव्हेंबरपासून बदल होणार आहेत.

मुंबई:  सरकारी बॅंकांच्या कामकाजाच्या वेळेत उद्यापासून म्हणजेच 1 नोव्हेंबरपासून बदल होणार आहेत. नव्या वेळापत्रकानुसार, आता निवासी भागात बँका सकाळी 9 वाजता सुरु होणार असून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत कामकाज चालणार आहे. तर काही बँकांमध्ये सकाळी 9 ते 3 पर्यंत काम सुरु राहणार आहे.

केंद्र शासनाच्या ईज (EASE) नुसार बँकांच्या सुधारणांतर्गत ग्राहकांसाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कामकाजाची वेळ एकसमान करण्यात आली आहे. IBA म्हणजेच इंडियन बँक असोसिएशनने बँकांच्या कामकाज वेळेसंदर्भात 6 ऑगस्ट 2019  रोजी काढलेल्या परिपत्रकात तीन प्रकारात वर्गीकरण केले आहे. त्यानुसार बँकांचे रहिवासी क्षेत्र, व्यापारी क्षेत्र आणि इतर बँकिंग प्रकारात हे वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यांनंतर अर्थ मंत्रालयाच्या बँकिंग डिव्हिजनने सर्व बँकांशी चर्चा केल्यानंतर, बँकांच्या शाखा ग्राहकांच्या सोयीनुसार उघडल्या जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

1 नोव्हेंबरपासून बँकांच्या कामकाजाच्या वेळा खालीलप्रमाणे :

रहिवासी (Residential) क्षेत्र : बँकेची वेळ 9 ते 4 ; ग्राहकांसाठी सकाळी 9 ते दुपारी 3.
व्यापारी (Commercial) क्षेत्र : बँकेची वेळ 11 ते 6 ; ग्राहकांसाठी सकाळी 11 ते संध्याकाळी 5.
इतर (इतर) बँका : बँकेची वेळ 10 ते 5 ; ग्राहकांसाठी सकाळी 10  ते दुपारी 5. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uniform Banking Hours in all Public Sector Banks on PAN India