esakal | अर्थसंकल्पाच्या दिवशी घडणार इतिहास!
sakal

बोलून बातमी शोधा

union budget 2020 will be historic because share market will remain open

येत्या 1 फेब्रुवारी रोजी शेअर बाजार नेहमीच्याच वेळेला खुले होणार आहेत. बाजारात सकाळी नऊ वाजल्यापासून दुपारी साडेतीन वाजेपर्यंत नेहमीप्रमाणेच व्यवहार पार पडणार आहेत. 

अर्थसंकल्पाच्या दिवशी घडणार इतिहास!

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई :आगामी केंद्रीय अर्थसंकल्प (Budget 2020) येत्या 1 फेब्रुवारी रोजी सादर केला जाणार आहे. शनिवारी 1 फेब्रुवारी रोजी शेअर बाजार दिवसभर खुले राहणार आहेत. मुंबई शेअर बाजाराने (बीएसई) दिलेल्या निवेदनात बाजार अर्थसंकल्पाच्या (Union Budget 2020) दिवशी शनिवारी खुले राहणार आहेत. साधारणतः बाजार आठवड्यातून दोन दिवस म्हणजे शनिवारी आणि रविवारी बंद असतात. मात्र अपवादात्मक किंवा विशेष कारण असल्यास बाजार शनिवारी आणि रविवारीही बाजार उघडले जाऊ शकतात.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बाजार कधी खुले राहणार?
येत्या 1 फेब्रुवारी रोजी शेअर बाजार नेहमीच्याच वेळेला खुले होणार आहेत. बाजारात सकाळी नऊ वाजल्यापासून दुपारी साडेतीन वाजेपर्यंत नेहमीप्रमाणेच व्यवहार पार पडणार आहेत. 

अर्थविश्व क्षेत्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे ►क्लिक करा

बाजार का खुले राहणार? 
अर्थसंकल्पात होणाऱ्या घोषणांचा शेअर बाजारावर काही  परिणाम होतो का हे पाहण्यासाठी बाजाराशी संबंधितांनी तो चालू ठेवण्याची विनंती केली होती. या विनंतीचा विचार करता शनिवारी अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजार खुला ठेवण्यात येणार आहे.

अर्थविश्व क्षेत्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे ►क्लिक करा

इतिहास काय सांगतो?
वर्ष 2015 मध्ये तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प सादर केले होता त्यावेळी देखील बाजार खुले ठेवण्यात आले होते. त्यादिवशी मात्र शेअर बाजार सकारात्मक पातळीवर बंद झाला होता. आता अर्थसंकल्पाच्या दिवशी बाजारातील घडामोडींकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.  मोदी सरकारने आजपर्यंत मांडलेल्या सहा अर्थसंकल्पांपैकी चार पूर्ण अर्थसंकल्पांच्या दिवशी शेअर बाजारात घसरण नोंदविण्यात आली आहे.