
पुणे, ता 28: देशाचा अर्थसंकल्प समाजातील सर्वच घटकांसाठी महत्त्वाचा असतो. सर्वसामान्यांच्या त्यातून काही अपेक्षासुद्धा असतात. तरुणाईची मोठी संख्या असलेल्या आपल्या देशातील तरुण आणि विद्यार्थीसुद्धा अर्थसंकल्पातील विविध तरतूदी आणि योजनांबद्दल सजगतेने विचार करत असून त्यांच्यासुद्धा बऱ्याच अपेक्षा आहेत. अर्थसंकल्प सादर होण्याच्या पार्श्वभूमीवर सकाळने तरुणाईशी खास संवाद साधत तरुण मुलांमुलींना अर्थसंकल्पाबाबत काय वाटते? अर्थसंकल्पात कोणत्या तरतूदी केल्या पाहिजेत? कोणकोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रीत करायला हवे ? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
पुणे, ता 28: देशाचा अर्थसंकल्प समाजातील सर्वच घटकांसाठी महत्त्वाचा असतो. सर्वसामान्यांच्या त्यातून काही अपेक्षासुद्धा असतात. तरुणाईची मोठी संख्या असलेल्या आपल्या देशातील तरुण आणि विद्यार्थीसुद्धा अर्थसंकल्पातील विविध तरतूदी आणि योजनांबद्दल सजगतेने विचार करत असून त्यांच्यासुद्धा बऱ्याच अपेक्षा आहेत. अर्थसंकल्प सादर होण्याच्या पार्श्वभूमीवर सकाळने तरुणाईशी खास संवाद साधत तरुण मुलांमुलींना अर्थसंकल्पाबाबत काय वाटते? अर्थसंकल्पात कोणत्या तरतूदी केल्या पाहिजेत? कोणकोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रीत करायला हवे ? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. बिनधास्त तरुणाई अगदी दिलखुलास पद्धतीने मुद्दे मांडत विविध विषयांवर आपली मते मांडली. विशेष म्हणजे वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेल्या या तरुण विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांकडे लक्ष वेधत त्यातील प्रश्नांवर मते मांडली. यात प्राप्तिकर, कृषी, शिक्षण, कौशल्यविकास, पायाभूत सुविधा, रोजगार, एमएसएमई यासारख्या विविध क्षेत्रांचा समावेश होता. या संवादाच्या निमित्ताने आर्थिक नियोजन आणि गुंतवणूकीच्या मुद्द्यावरही तरुणाई आग्रहाने मते मांडली.
1 ) आर्थिक साक्षरता वाढवण्यावर भर दिला जावा तसेच पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमात त्या विषयांचा समावेश व्हावा
डॉ वीरेंद्र ताटके, संचालक , इंदिरा ग्लोबल बिझनेस स्कूल
2) महिलांना व्यवसाय-उद्योगात येण्यासाठी प्रोत्साहन मिळावे. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली जावी
पूजा मोहारीर
3) शैक्षणिक कर्जावरील व्याजदर कमी व्हावा तसेच स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रम अधिक प्रमाणात व्हावेत यासाठी आर्थिक तरतूद व्हावी .
आयुष्यमान सिंग
4 ) प्राप्तिकराची मर्यादा वाढवली जावी जेणेकरून करदात्यांच्या हातात अधिक पैसे राहील आणि त्यांची खरेदीची क्रयशक्ती वाढेल. तसेच शैक्षणिक शुल्कासाठी प्रप्तिकरातून अधिक सवलत मिळावी .
श्वेता जाधव
5) शेतकऱ्यांसाठी भरीव मदत मिळावी तसेच शेतीतील उत्पादन खर्च कमी होऊन शेतकऱ्याचे उत्पन्न वाढेल यासाठी उपाययोजना केल्या जाव्यात.
शुभम सानप
6) ग्रामीण भागात पायाभूत सुविधा आणि दळणवळणाची साधने पोहचवली जावीत जेणेकरून तेथील इंडस्ट्रीची प्रगती होईल
राधिका गौड
7 ) स्टार्टअप व्यवसायांसाठी अधिक मदत व्हावी
मोहित आकांत