Wed, Feb 8, 2023

UPI Down : न्यू इअर सेलिब्रेशनला 'ब्रेक'; गुगल पे, फोन पे वरून होईना पेमेंट
Published on : 31 December 2022, 3:18 pm
सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नव्या वर्षाचं स्वागत करताना लोक सिलेब्रेशनच्या मूडमध्ये आहेत. पण त्यांचा हा सेलिब्रेशनचा मूड सध्या खराब झालेला दिसतोय. त्याच कारण ठरलंय युपीआय पेमेंट. लोकांना पेटीएम, फोन पे आणि गुगल पेवरुन पेमेंट करता येत नाहीए, त्यामुळं वैतागलेल्या युजर्सनी ट्विटरवर तक्रारींचा पाऊसच पाडला आहे. (UPI Down Break to New Year Celebrations Payment issue via Google Pay Phone Pay)
यूपीआय पेमेंट होत नसल्यानं वैतागलेल्या युजर्सनं मजेशीर ट्विट करायला सुरुवात केली आहे. "न्यू इअर आणि युपीआय डाऊन काय लव्ह स्टोरी आहे", "युपीआयच्या भरवशावर मोमोज खायची सवय एकदा मला मार खायला घालणारे!", "संपूर्ण यूपीआय नेटवर्क डाऊन झालंय काय सुरुए हे?", "हैदराबादमध्ये पेट्रोल भरताना पेमेंट होत नाहीए, कोणी पेमेंट करेल का?"