Budget 2019 : 'उरी'चा Hows the Josh थेट अर्थसंकल्पात

Friday, 1 February 2019

अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : सहसा अर्थसंकल्प म्हणजे दीर्घ काळ भाषण आणि अधूनमधून शायरीचा वापर असेच स्वरूप असते. यंदा मात्र हंगामी अर्थमंत्री पीयुष गोयल यांनी चक्क 'उरी' या चित्रपटाचा लोकसभेमध्ये उल्लेख केला.

भारताने पाकिस्तानमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर 'उरी' हा चित्रपट आधारित आहे. चित्रपट रसिकांसह बॉलिवूडमधील कलाकार आणि राजकीय नेत्यांनीही या चित्रपटाचे कौतुक केले आहे. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत एका कार्यक्रमात 'उरी'मधील How's The Josh या प्रसिद्ध संवाद म्हटला होता. 

आता गोयल यांनीही थेट अर्थसंकल्पाच्या भाषणामध्ये 'उरी'चा उल्लेख केला आहे.  बॉलिवूड चित्रपट बघायला आपल्या सगळ्यांनाच आवडतात. नुकताच उरी चित्रपट बघितला आणि त्याचा आपल्याला अभिमान वाटल्याचे पियुष गोयल यांना अर्थसंकल्पादरम्यान सांगितले.

तसेच चित्रपटनिर्मितीमुळे अनेकांना रोजगारही मिऴतो. यासाठी काम होणे गरजेचे आहे. असे सांगताना गोयल यांनी निर्मात्यांना चित्रपटनिर्मितीसाठी 'एक खिडकी योजनेची' तरतूद करणार असल्याची घोषणा केली. तसेच पायरसी होऊ नये यासाठी नवीन सिनेमॅटोग्राफी ऍक्टची तरतूद करणार असल्याचेही सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uri The surgical strike movie named in Budget 2019