अमेरिका-चीन व्यापार युद्ध आणखी भडकले 

अमेरिका-चीन व्यापार युद्ध आणखी भडकले 

वॉशिंग्टन: आर्थिक महासत्तेची केंद्रे असलेल्या अमेरिका आणि चीन या दोन देशांमधील व्यापार युद्धाच्या दुसऱ्या टप्प्याला शुक्रवारी रात्री 12 वाजता सुरुवात झाली. अमेरिकेकडून आता चीनमधील तब्बल 200 अब्ज डॉलर्सच्या मालावर 25 टक्के आयात कर आकारण्यात आला आहे. याअगोदर देखील जुलै 2018 मध्ये चीनमधून आयात करण्यात येणाऱ्या वस्तूंवर १५ टक्के आयात कर आकारण्यात येत आहे. यात आता आणखी १० टक्क्यांची वाढ करण्यात आले आहे.  आता एकूण 400 अब्ज डॉलर्सच्या व्यापारावर याचा परिणाम होणार आहे. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवीन आयातकराची कराची घोषणा 5 दिवसांपूर्वीच केली होती. त्यानंतर चीनचे उपाध्यक्ष ली हे अमेरिकेच्या  उच्च्पदस्थांची चर्चा करण्यासाठी अमेरिकेला दाखल झाले होते. मात्र द्विपक्षीय चर्चेला यश आले नसून ट्रम्प यांच्या भूमिकेमध्ये काहीही बदल झालेला नाही. आयात कराच्या अंमलबजावणीमुळे चीनमधून निर्यात होणाऱ्या तब्बल 5700 वस्तू महाग होणार आहेत. त्यात इंटरनेट मॉडेम, राउटर आणि इतर डेटा ट्रांसमिशन डिव्हाइसेस संबंधीचे उद्योग क्षेत्र सर्वाधिक प्रभावित होणार आहे. ट्रम्प यांच्याकडून कठोर भूमिका घेण्यात आल्यामुळे निम्न मध्यमवर्गीय अमेरिकी नागरिकांना याचा मोठा फटका बसणार आहे. व्हाईट हाऊसद्वारे जारी केलेल्या निवेदनामध्ये देखील व्यापाराशी संबंधित ३०१ कलमाशी संबंधित ट्रम्प यांच्या कठोर भूमिकेमुळे अमेरिकी लोकांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com