esakal | "युटीआय एएमसी'चा आयपीओसाठी अर्ज 
sakal

बोलून बातमी शोधा

UTI AMC files papers for IPO with Sebi

"युटीआय एएमसी'चा आयपीओसाठी अर्ज 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : युटीआय ऍसेट मॅनेजमेंट कंपनीने (युटीआय एएमसी) सिक्‍युरिटीज एक्‍स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे (सेबी) प्राथमिक समभाग विक्रीसाठी (आयपीओ) अर्ज दिला आहे. कंपनीने सादर केलेल्या "ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्‍टस'नुसार (डीआरएचपी) कंपनी 3.89 कोटी शेअरची विक्री करणार आहे. आयपीओच्या माध्यमातून कंपनी सुमारे तीन हजार कोटी रुपयांचा निधी उभारण्याची शक्‍यता आहे. 

यात स्टेट बॅंक ऑफ इंडिया (एसबीआय) युटीआय एएमसीमधील 1.04 कोटी शेअर, भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) 1.04 कोटी शेअर, बॅंक ऑफ बडोदा 1.04 कोटी शेअर, पंजाब नॅशनल बॅंक (पीएनबी) 38 लाख शेअर आणि टी रोव प्राईस इंटरनॅशनल 38 लाख शेअरची विक्री करणार आहे. या सर्व वित्तसंस्थांचा युटीआय एएमसीमध्ये हिस्सा आहे. 

आयपीओचे व्यवस्थापन कोटक महिंद्रा कॅपिटल, ऍक्‍सिस कॅपिटल, सिटी बॅंक, डीएसपी मेरील लिंच, आयसीआयसीआय सिक्‍युरिटीज, जे एम फायनान्शियल आणि एसबीआय कॅपिटल या वित्तसंस्था करणार आहेत. युटीआय एएमसीच्या शेअरची नोंदणी मुंबई शेअर बाजार (बीएसई) आणि राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) केली जाणार आहे. 30 सप्टेंबर 2019 अखेर युटीआय एएमसी आघाडीची कंपनी असून व्यवस्थापनाखालील मालमत्ता 1.52 लाख कोटी रुपयांवर पोचली आहे. 
 

loading image