एक बँक जिथं पैशांचे नाही तर प्रभू रामाच्या नावाने होतात व्यवहार

Ram Ramapati Bank
Ram Ramapati Bankesakal
Updated on
Summary

भोले शहरातील काशीमध्ये (Kashi) अशी एक अनोखी बँक आहे, ज्याची संपूर्ण देशात चर्चा आहे.

भोले शहरातील काशीमध्ये (Kashi) अशी एक अनोखी बँक आहे, ज्याची संपूर्ण देशात चर्चा आहे. या अनोख्या बँकेत पैसा नाही, तर भगवान रामाच्या नावानं कर्ज दिलं जातं. ऐकून थोडं आश्चर्य वाटतंय ना? पण, हे खरंय. विशेष म्हणजे, या बँकेकडून कर्ज घेण्यासाठी ग्राहकांची श्रध्दा आणि भक्ती बघितली जाते. वाराणसीच्या (Varanasi) विश्वनाथ रस्त्यालगत असलेल्या या बँकेनं आतापर्यंत लाखो लोकांचं नशीब उघडलंय आणि याच कारणानं भक्त या अनोख्या बँकेत येत असतात. वाराणसीच्या राम रमापती बँकेची (Ram Ramapati Bank) आतापर्यंत 19 अब्जाहून अधिक हस्तलिखित 'रामनाम'ची पुंजी झाली असून ती दिवसेंदिवस वाढत आहे.

बँकेचे संचालक सुमित मेहरोत्रा ​​यांनी सांगितलं, की सर्वात प्रथम बँक ग्राहकांकडून 'संकल्प पत्र' भरुन घेते. त्यानुसार कर्ज घेतलेल्या भक्तांना 8 महिने 10 दिवस सतत शुद्ध (शाकाहारी) अन्न खावं लागतं. या दरम्यान, भक्तांना दररोज 500 वेळा 'राम'चं नावं लिहावं लागतं. आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी भक्त हे करतात. या बँकेत तीन प्रकारचे भक्त येतात. यामध्ये लेखन, पठण आणि नामजपाचा उपवास करणाऱ्या भक्तांचा समावेश आहे.

Ram Ramapati Bank
हिंदू मंदिरांवर दगडफेक, तोडफोड करणाऱ्यांना मी सोडणार नाही

बँक स्वतः ग्राहकांना पेन आणि कागद पुरवते

या अनोख्या बँकेत कर्ज घेतल्यानंतर, बँक स्वतः भक्तांना 'राम' नाव लिहिण्यासाठी पेन आणि कागद पुरवते. भक्तांना कागद आणि एक विशेष प्रकारचा पेन बँकेकडून दिला जातो, ज्याद्वारे कर्ज घेणारे भक्त 'राम' असं नाव लिहितात.

Ram Ramapati Bank
चर्च-ख्रिश्चन मिशनऱ्यांवर सरकारची करडी नजर; धर्मांतर केल्यास होणार कारवाई

भगवान श्रीरामानं 'इच्छा' पूर्ण केल्या

या बँकेचे भक्त, ग्राहक चेतन सांगतात, आतापर्यंत त्यांनी या बँकेकडून तीन वेळा कर्ज घेऊन 'राम'चं नाव लिहिलंय. भगवान श्रीरामानं त्यांच्या तीन इच्छा पूर्ण देखील केल्या आहेत आणि आता चौथ्यांदा ते हे काम करत आहेत.

Ram Ramapati Bank
बांगलादेशात दुर्गा पूजेदरम्यान हिंदू मंदिरावर हल्ला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com