
कामगार आणि रोजगार मंत्रालयाने दीड कोटी केंद्रीय क्षेत्रातील कामगारांसाठी परिवर्तनीय महागाई भत्ता (VDA) वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. व्हेरिएबल डिअरनेस अलावंस ((Variable Dearness Allowance) मधील वाढ 1 ऑक्टोबरपासून लागू होईल. यामुळे केंद्रीय क्षेत्रातील कर्मचारी आणि कामगारांच्या किमान वेतनात वाढ होणार आहे.
यासंदर्भात केंद्रीय मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे. देश महामारीशी झुंज देत असताना केंद्रीय क्षेत्रातील रोजगारांमध्ये गुंतलेल्या विविध श्रेणीतील कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयाने VDA संबंधी काही सुधारणा केल्या आहेत. त्या 1 ऑक्टोबर 2021 पासून लागू होतील.
CPI-IW च्या आधारावर VDA मध्ये संशोधन
औद्योगिक कामगारांसाठी सरासरी ग्राहक किंमत निर्देशांक (CPI-IW) च्या आधारावर VDA सुधारित केले आहे. हा किंमत निर्देशांक लेबर ब्युरोने संकलित केलाय. डिअरनेस अलावंसमधील या पुनरावृत्तीसाठी या वर्षी जानेवारी ते जून महिन्यातील सरासरी CPI-IW वापरण्यात आला आहे.
VDA मधील वाढ 1 ऑक्टोबर 2021 पासून लागू
केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी निवेदनात म्हटले आहे की, देशभरातील केंद्रीय क्षेत्रातील विविध अनुसूचित रोजगारासंबंधी गुंतलेल्या सुमारे 1.5 कोटी कामगारांना याचा फायदा होईल. हे कामगार बांधकाम, रस्ते, धावपट्ट्यांची देखभाल, बिल्डिंग ऑपरेशन, स्वच्छता सामानाचं लोडिंग आणि अनलोडिंग इत्यादी कामात गुंतलेले आहेत. ते म्हणाले की, पंतप्रधानांच्या 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास' या संकल्पनेला अनुसरून हा निर्णय घेण्यात आला आहे. ही वाढ 1 ऑक्टोबर 2021 पासून लागू होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.