वाहन उद्योगाचा ‘रिव्हर्स गिअर’

Vehicle-Production
Vehicle-Production

ऑगस्टमध्येही विक्रीत घसरगुंडी कायम; उत्पादनही घटले 
नवी दिल्ली - मंदीच्या गाळात रुतलेली वाहन उद्योगाची गाडी बाहेर निघण्याऐवजी आणखी फसत चालली आहे. ऑगस्ट महिन्यात घाऊक वाहनविक्रीत मोठी घसरण नोंदविली असून, ही आतापर्यंतची सर्वांत वाईट स्थिती असल्याचे सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्‍चरर्सने (सियाम) म्हटले आहे.

‘सियाम’ १९९७-९८ पासून घाऊक वाहनविक्रीच्या नोंदी ठेवत आहे. या संघटनेने सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ऑगस्ट महिन्यात सर्व प्रकारच्या वाहनांच्या विक्रीत २३.५५ टक्के घसरण झाल्याचे स्पष्ट झाले. गेल्या महिन्यात एकूण १८,२१,४९० वाहनांची विक्री झाली. गतवर्षी याच कालावधीत हा आकडा २३,८२,४३६ इतका होता. मंदीच्या पार्श्‍वभूमीवर कंपन्यांनी उत्पादनात कपात केल्याने ऑगस्टमध्ये त्यात १२.२५ टक्‍क्‍यांची घट झाल्याचे ‘सियाम’ने म्हटले आहे. तत्पूर्वी जुलै महिन्यात वाहनविक्रीने गेल्या १९ वर्षांतील नीचांकी स्तर गाठला होता. 

वाहन उद्योगाला सावरण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजनांचा परिणाम अद्याप दिसून आलेला नाही. चालू महिन्याअखेरीस याबाबतचे चित्र स्पष्ट होईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. दरम्यान, वाहन उद्योग व सुट्या भागांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून जीएसटीत कपात करण्याची मागणी होत असून, २० सप्टेंबरला होणाऱ्या जीएसटी परिषदेच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.   

किरकोळ विक्रीची स्थिती
ऑगस्टमध्ये किरकोळ एकूण वाहनविक्रीत ४.१५ टक्‍क्‍यांची घसरण नोंदविली. गेल्या महिन्यात एकूण १६ लाख ३७६ वाहनांची विक्री झाली. गतवर्षी ऑगस्टमध्ये हा आकडा १६ लाख ६९ हजार ७५१ इतका होता. यंदा किरकोळ प्रवासी वाहनांच्या विक्रीत ७.१३, तर दुचाकींच्या विक्रीत ३.४ टक्‍क्‍यांची घसरण झाल्याचे ‘सियाम’ने म्हटले आहे.  

कंपनीनिहाय विक्री (घट)
- मारुती-सुझुकी - ९३,१७३ (३६.१४%)
- ह्युंदाई  - ३८,२०५ (१६.५८%)
- महिंद्रा अँड महिंद्रा - १३,५०४ (३१.५८%)
- हिरो मोटोकॉर्प - ५,२४,००३ (२०.९७%)
- होंडा - ४,२५,६६५ (२६.२६%)
- टीव्हीएस - २,१९,५२८ (२०.३७%)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com